Headlines

‘मालिका खूप चालली, आता पुढे काय दाखवणार?’, ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1]

Milind Gawali Post On Serial Time : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका 2019 ला सुरु करण्यात आली. या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. या मालिकेतील अनेक कलाकार हे लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सध्या या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका दुपारी 2.30 च्या सुमारास प्रसारित केली जाते. यावरुन अनेकांनी मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वेळेत बदल करण्यात आला, असे म्हटले होते. आता याबद्दल अभिनेता मिलिंद गवळींनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारताना दिसतात. आता मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. यात त्यांनी मालिकेच्या वेळेत बदल झाल्याने प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी होती, याबद्दल सांगितले आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट 

“आई कुठे काय करते” आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता. जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनल लागलेला असायचं, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो असंख्य कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडे “आई कुठे काय करते” ही मालिका आवर्जून बघितली जाते, त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही, आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता “आई कुठे काय करते “ ही मालिका बघितली जायची. 

आता 18 मार्चपासून चा निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात च्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल, संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का असा एक मनामध्ये प्रश्न येत होता, पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की “आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का “ ! मला ऐकून छान वाटलं. आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे. मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये, संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टार वर असो बघणारे हे आवडीने बघतातच. 

मला खरंच स्टार प्रवाह चं ,राजनशाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, creative team चं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं, उत्तम काम करायचीconsistency, creative thinking, persistency, बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत ? 

पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट , ही इतक्या लवकर कशी संपू शकेल , जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये interesting, unpredictable, आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारा घडत असतं, आजही मला करताना तेवढीच मजा येते आहे . बरं ईथे बाहेर अतिशय ऊन वाढलेला आहे, 37\38 डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर, तुम्ही पण सगळे काळजी घ्या भरपूर पाणी पीत जा, शक्यतो उन्हात जाऊ नका, असे आवाहनही मिलिंद गवळींनी केले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळींच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर एका चाहतीने मी सकाळी ब्रेकफास्ट तयार करताना मालिका पाहते, कारण दुपारी बाहेर असले की पाहता येत नाही, अशी कमेंट केली आहे. तर एकाने खूपच छान सुरु आहे मालिका, असे म्हटले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *