Headlines

घटस्फोटानंतर मलायकाला पोटगीत मिळाली मोठी रक्कम? 7 वर्षांनंतर अभिनेत्रीनं केला खुलासा

[ad_1]

Malaika Arora on Divorce and Alimony : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या घटस्फोटावर अनेकदा बोलली आहे. मलायका आणि अरबाज यांनी 19 वर्ष संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला. मलायकानं वयाच्या 25 व्या वर्षी अरबाजसोबत लग्न केलं. मात्र, जेव्हा त्यांनी घटस्फोट घेतला तेव्हा तिला अनेकांनी टोमणे मारले अनेकांनी तिला ट्रोल केलं. इतकंच नाही तर तिनं खूप मोठी पोटगी घेतल्याचं देखील म्हटलं. त्यामुळेच ती इतके महागडे कपडे घेऊ शकते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मलायकानं पुन्हा एकदा लग्न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

मलायका अरोरानं नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं 25 व्या वर्षी लग्न का केलं? याविषयी खुलासा केला आहे. मलायकानं सांगितलं की ‘असं नाही की मी अशा वातावरणात मोठी झाली नाही की जिथे सांगतात की या वयात तुला लग्न करावं लागेल. मला माझं आयुष्य जगण्यासाठी, बाहेर जाऊन एन्जॉय करण्यासाठी, जास्त लोकांना भेटण्यासाठी आणि नाती बनवण्यास सांगितलं. मला सगळं सांगितलं होतं. तरी, माझ्या डोक्यात काय आलं मला नाही माहित आणि मी म्हटलं की 22-23 व्या वयात मला लग्न करायचं आहे. कोणी माझ्यावर दबाव टाकला नाही, मात्र त्यावेळी ते करण्याची मला गरज होती कारण त्यावेळी माझ्या जवळ असलेला हाच सगळ्यात चांगला ऑप्शन होता.’ 

मलायकानं सांगितलं की ‘लग्नाच्या काही वर्षांनंतर त्याला ही जाणीव झाली की हे ते नाही, जे तिला हवं होतं. मात्र, जेव्हा अरबाजपासून दूर होण्याचा निर्णय तिनं घेतला, तेव्हा तिच्यावर अनेकांनी प्रश्न केले तिची खिल्ली उडवली. याविषयी सांगताना मलायका म्हणाली, जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा चित्रपटसृष्टीत अशा खूप महिला नव्हत्या. ज्यांनी घटस्फोट घेतला होता आणि आयुष्यात पुढे जात होत्या. मला वाटलं, माझ्यासाठी, माझ्या पर्सनल ग्रोथसाठी, माझ्या आवडीसाठी जर मला माझ्या मुलाला आनंदी ठेवायचं आहे आणि त्याला आनंदानं मोठं होताना पाहायचं आहे तर मला आतून चांगलं वाटायलं म्हणजेच आनंदी असायला हवं. तर मी तेच केलं.’ 

हेही वाचा : Shaitaan Collection Day 2: सुरु झाला ‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई

घटस्फोटानंतर परिधान केलेल्या एका ड्रेसच्या किंमतीवर असलेल्या एका बातमीवर मलायकानं पुढे वक्तव्य केलं. तिनं सांगितलं की ‘तिनं परिधान केलेल्या एका ड्रेसच्या किंमतीवरून एका पब्लिकेशननं एक आर्टिकल लिहिलं आणि त्यावर अश्लील कमेंट येऊ लागल्या होत्या. त्या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की मलायकानं पोटगीत खूप मोठी रक्कम घेतली असणार, त्यामुळे इतके महागडे कपडे घेऊ शकते. हे सगळं वाचून तिला आश्चर्य झाल्याचं तिनं सांगितलं.’ [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *