Headlines

‘मला प्रेमरोग झालाय…’, मानसी नाईकने दिली जाहीर कबुली, म्हणाली ‘प्रेमात पडल्यानंतर…’

[ad_1]

Manasi Naik Fall In Love Post : ‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यांमधून चाहत्यांना वेड लावणार अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. तिला तिच्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवता येतात. गेल्या वर्षभरापासून मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच मानसी नाईकने पती प्रदीप खरेरापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. यानंतर आता तिने जाहीररित्या प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. तिने स्वत: याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. 

मानसीच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

मानसी नाईक ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगताना दिसते. मानसीचे रील व्हिडीओ हे सतत चर्चेत असतात. आता मानसीच्या दोन रीलची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या व्हिडीओला तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

दोन रील्सची सर्वत्र चर्चा

मानसी नाईकने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केले आहे. यात मानसी ही ‘जोगी जी धीरे धीरे’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने “मला प्रेम रोग झालाय”, असे म्हटले आहे. त्यासोबतच तिने हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. 

तर दुसऱ्या व्हिडीओत ती दिलजीत दोसांझ आणि बादशाहच्या गाण्यावर रील शूट करताना दिसत आहे. या व्हिडीओलाही तिने हटके कॅप्शन दिले आहे. “मी काही पाऊंड्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण प्रेमात पडल्यानंतर खूप भूक लागते”, असे मानसीने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहेत. त्यासोबतच तिने हार्ट इमोजीसोबतच पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज्स, चीझ, आईस्क्रीम यांसारखे खाण्याचे काही इमोजीही पोस्ट केले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच झालाय घटस्फोट

मानसीच्या या दोन्ही पोस्टद्वारे तिने पुन्हा प्रेमात पडल्याचे संकेत दिले आहेत. पण ती नक्की कोणत्या मुलाच्या प्रेमात पडली, तो कोण आहे, काय करतो याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान मानसी नाईकने 19 जानेवारी 2021 ला बॉक्सर असलेल्या प्रदीप खरेराशी लग्न केले होते. त्याआधी काही काळ ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत असायचे. पण अचानक त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले. त्यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मानसीने एका मुलाखतीद्वारे प्रदीपसोबत घटस्फोट घेत असल्याचे सांगितले होते.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *