Headlines

‘मला एकटं पाडलं, मानसिक खच्चीकरण…’, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनालीला महाराष्ट्राची अप्सराही म्हटलं जातं. आज पर्यंत या अभिनेत्री एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. आज या अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र सोनालीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये सोनालीने धक्कादायक खुलासे केले आहेत.  एक काळ असा आला होता जेव्हा सोनालीवर इंडस्ट्री सोडण्याची वेळ आली होती. असा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमधून केला आहे.

नुकतीच सोनालीने सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये सोनाली बोलताना दिसतेय की, “ज्यावेळी मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या आयुष्यात अडचणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या लोकांनी मला कसा त्रास होईल याची योग्य काळजी घेतली. कारण, ते त्या पोझिशनवर होते. त्यांनी त्या पोझिशनचा गैरवापर केला, इतरांवर दबाव टाकला. आता मी विचार करते की, त्यावेळी ते सिनेमा केले असते तर फारसा फरक पडला नसता. पण मला त्या भूमिका करायच्या नव्हत्या,” असं सोनाली या मुलाखतीमध्ये बोलली. 

सोनाली पुढे म्हणाली, “असे काही लोक असतात ज्यांना असं वाटतं की, आपण अशा जागी आहोत जेथे अभिनेत्री आपल्यासाठी ही गोष्ट करेल. पण, मी त्या गोष्टींना नकार दिला  म्हणून त्यांनी पुरेपूर काळजी घेतली की मी कशा प्रकारे त्या प्रोडक्शन आणि त्या चॅनेलबरोबर काम करणार नाही. मला कुणी काम देणार नाही. मला सेटवर एकटं पाडण्यात येत होतं. माझं मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं. मला माझ्याच गाण्यावर नाचल्याबद्दल रॉयल्टी मागण्यात येत होती”.

याचबरोबर अभिनेत्री पुढे असंही म्हणाली की,  ‘अप्सरा आली’वर डान्स केला म्हणून मला मेल रॉयल्टी पाठवा असे मेल यायचे. इतके इतके पैसे भरा वगैरे. ते फार घाबरवणारं होतं. खूप अनपेक्षित होतं.” असा धक्कादायक खुलासा सोनालीने दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. सोनाली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतं. सध्या सोनालीने केललं वक्तव्य खूप चर्चेत आहे.

सोनाली ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आत्ता पर्यंत अभिनेत्रीने मराठी हिंदी मल्ल्याळम सिनेमात काम करुन आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *