Headlines

‘माझा बाप आहे तो, अख्खं जग रुसेल पण…’ भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी भावूक, पण गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट; पाहा Video

[ad_1]

Jitendra Joshi in Gupte Tithe khupte: झी मराठी प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी, राजकीय नेतेमंडळींनी या कार्यक्रमात (Gupte Tithe khupte) हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. राज ठाकरे, नितीन गडकरी, नारायण राणे ते देवेंद्र फडणवीस अशा राजकीय नेत्यांनी या मंचावरून आपली रोखठोक मतं मांडली. तर सई ताम्हणकरपासून ते श्रेयस तळपदे अशा कलाकारांनी या मंचावर अनेक किस्से शेअर केले आहेत. अशातच आता प्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने देखील गुप्ते तिथे खुपते कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो आता समोर आला आहे.

जितेंद्र जोशीने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्यावेळी त्यांना खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. त्याला जितेंद्र जोशीने मनमोकळी उत्तरं दिली आहेत. अवधुत गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांनी एक गाणं म्हणत एकत्र एन्ट्री मारली. त्यावेळी जितेंद्र जोशीने ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये अभिनेते संजय मोने यांच्याबद्दलचा कधीही न ऐकलेला किस्सा सांगितला. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यामध्ये संजय मोने (Sanjay Mone) हे जितेंद्र जोशीवर नाराज असल्याचं दिसून आलंय. नेमकं काय झालं? पाहा…

जितेंद्र जोशी संजय मोने यांचा वाढदिवस विसरला होता. त्यामुळे मोने काका नाराज झाले होते. त्यावर जितेंद्र जोशी याला स्पष्टीकरण मागीतलं. अख्खं जग रुसेल पण काका नाही रुसणार… एवढं नातं घट्ट आहे, असं जितेंद्र जोशी म्हणतो. काका माझ्यावर कधीही नाराज होऊ शकत नाहीत. माझा बाप आहे तो. माझ्या अपघातानंतर त्याने मला उभं केलंय रे, असं म्हणत जितेंद्र जोशी भावूक झाल्याचं दिसून आलं. अपघातानंतर मला मी हिरो असल्याची जाणीव त्यांनीच करून दिली. मी हिरो आहे हे त्याने माझ्यात रुजवलं. त्याच्यामुळे मी पुन्हा पाय घट्ट रोवून उभा राहिलोय, असं म्हण जितेंद्र जोशी यांनी मोने काका यांचे आभार मानले.

पाहा Video

दरम्यान, जितेंद्र जोशीच्या या उत्तरानंतर मंचावर चक्क संजय मोने आले. त्यांना पाहून जितेंद्र जोशी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. जितेंद्र जोशीने संजय मोने यांचे पाय धरले आणि त्यांना मिठी देखील मारली. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. जितेंद्र जोशी याने फोन कॉलवेळी थेट निसर्ग राजाला फोन लावला. त्याचा प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *