Headlines

Mahesh Babu Father`s Death : वडिलांचं पार्थिव पाहून लहान मुलाप्रमाणं रडला महेश बाबू

[ad_1]

Mahesh Babu Father Death : मंगळवारी, म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी दाक्षिणात्य अभनेता महेश बाबू याचे वडील, सुपरस्टार कृष्णा गुरु यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबू (Mahesh babu) आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा एक धक्काच होता. काही दिवसांपूर्वीच आईच्या निधनामुळं कोलमडलेला महेश बाबू या दु:खातून सावरत नाही, तोच त्याच्यावर संकटांचा आणखी एक डोंगर कोसळला.

दाक्षिणात्य कलाजगतामध्ये मोलाचं योगदान

दाक्षिणात्य चित्रपट विश्वात प्रसिद्ध असणाऱ्या घट्टमनेनी शिवा रामा मूर्ती म्हणजेच कृष्णा गुरु (Krishna Guru Death) यांनी 350 चित्रपटांहून अधिक कलाकृतींमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं. सोबतच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं.

14 नोव्हेंबरला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनानं तर महेश बाबूचे अश्रू थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचणाऱ्यांना मिठी मारून तो एखाद्या लहान मुलाप्रमाणं हमसून हमसून रडताना दिसत आहे.

एकाच वर्षात कुटुंबातील तीन व्यक्तींचं निधन

2022 च्या सुरुवातीलाच महेश बाबूचा भाऊ, रमेश बाबू यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुढे अभिनेत्याया आईंही जगाचा निरोप घेतला आणि आता वडिलांच्या निधनानमुळं हे कुटुंब जणू पोरकं झालं.

South indian Superstar Mahesh Babu crying like a child at Fathers funeral

South indian Superstar Mahesh Babu crying like a chile at Fathers funeral

पत्नी आणि लेकरांनाही अश्रू अनावर

फक्त महेश बाबूच नव्हे, तर त्याची लेक, पत्नी – अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनासुद्धा या संकटातून नेमकं कसं सावरावं हेच कळेना. परिणामी ही मंडळीसुद्धा अश्रुंवाटे भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

आपल्या आवडत्या अभिनेत्याला असं कोलमडलेलं पाहून चाहतेही शोकाकूल झाले आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झटणाऱ्या या कलाकाराच्या कुटुंबाला संकटात पाहून अनेकांनीच त्यांना धीरही दिला आहे. प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये असणारं एक अव्यक्त नातं यानिमित्तानं समोर आलं आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *