Headlines

Mahesh Babu चा सावत्र भाऊ चौथ्यांदा अडकतोय लग्न बंधनात! सोशल मीडियावर एकच खळबळ !

[ad_1]

Mahesh Babu’s Step Brother Naresh Getting Married For 4th Time : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू  (Mahesh Babu) हा लोकप्रिय अभिनेता आहे. महेश बाबू हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. सध्या महेश बाबू हा सध्या त्याचा सावत्र भाऊ नरेश बाबू  (Naresh Babu’s Forth Marriage) याच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आहे. नरेश बाबू मूव्हीजनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड पवित्रा लोकेश (Pavistra Lokesh) सोबत लग्न करणार असल्याचा खुलासा केला आहे. नरेश बाबूनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हा खुलासा केला आहे. नरेश बाबू चौथ्यांदा लग्न करणार असल्यानं या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी नरेश बाबूला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या तर काही नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. 

महेश बाबू यांचा सावत्र भाऊ नरेश बाबूनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी नरेश आणि पवित्रा एकत्र दिसत असून त्यांच्या आजूबाजुला रोमॅंटिक सेटअप आहे. ते सगळ्यात आधी केक कापतात आणि नंतर एकमेकांना केक भरवत किस करताना दिसत आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करत नरेश यांनी हा व्हिडीओ शेअर केला. 

मात्र, सगळ्यांचे लक्ष हे नरेश बाबू यांनी व्हिडीओच्या शेवटी केलेल्या एका घोषणेनं वेधले आहे. नरेश बाबू यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत ते सगळ्यात शेवटी त्यांच्या चौथ्या लग्नाची घोषणा केली आहे. लवकरच पवित्रा-नरेश लग्न बंधनात अडकणार असे ते म्हणाले आहेत. नरेश बाबू यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. 

हेही वाचा : ‘लग्न एकाशी आणि रोमान्स दुसऱ्याशी…’, विशाल सिंगसोबत रोमॅन्टिक डान्समुळे Devoleena Bhattacharjee ट्रोल

नरेश बाबू यांना ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, इथे आमच्या पहिले लग्न होत नाही आणि याचं हे चौथं लग्न. दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, याला काही लाज आहे की नाही किती वेळा लग्न करणार. महेश बाबूचा भाऊ नरेश बाबू हा देखील दाक्षिणात्य चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नरेश बाबूनं आतापर्यंत जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

नरेश बाबूची लव्ह स्टोरी ही नेहमीच चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय ठरली आहे. नरेश बाबूनं या  आधी तीन लग्न केली आहेत. नरेश बाबूची तिन्ही लग्न ही अपयशी  ठरली आहेत. नरेश बाबू आता चौथ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, नरेश बाबू आणि अभिनेत्री पवित्रा लोकेशशी लग्न करणार आहे. पवित्रा लोकेश ही कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *