Headlines

‘महापरिनिर्वाण’मधून गौरव मोरे प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसाद ओकच्या चित्रपटाची तारीख ठरली

[ad_1]

Mahaparinirvan Movie Relese Date : शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता. नामदेवराव व्हटकर हे या सगळ्या प्रसंगाचे एकमेव साक्षीदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेरात टिपलेल्या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट कधी प्रदर्शित  होणार, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक कथा दोन इतिहास’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना आणि घटनांचा उलगडा यात केला जाणार आहे. यात नामदेवराव व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. तसेच अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. 

पण या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे आहेत. तर अमर कांबळे हे डीओपी आहेत. या चित्रपटाचे लेखन चेतक घेगडमल यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती सुनील शेळके यांनी केली आहे. 

सुनील शेळके यांची प्रतिक्रिया

”आम्हाला आनंद आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. हा चित्रपट म्हणजे आमच्याकडून ही एक मानवंदना आहे. ‘एक कथा दोन इतिहास’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. असंख्य जनसागर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहित नाहीत, त्या विस्तृतपणे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. अवघी मुंबापुरी यावेळी थांबली होती. हा मन सुन्न करणारा प्रसंग आपण नामदेवराव व्हटकर यांच्या नजरेतून पाहाणार आहोत.” असे सुनील शेळके यांनी यावेळी म्हटले. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *