Headlines

किंग खानच्या ‘जवान’साठी माधुरीनं शेअर केली खास पोस्ट, म्हणते ‘पुन्हा एकदा…’

[ad_1]

Madhuri Dixit on Shah Rukh Khan’s Jawan : बॉलिवूड अभिनेता शाहरुखच्या जवानची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. या चित्रपटाला पाहण्यासाठी फक्त शाहरुखचे चाहते नाही तर त्याचे सह-कलाकार आणि इतर सेलिब्रिटी देखील तितकेच उत्साही होते. शाहरुखच्या पठाणनंमुळे आता चाहत्यांमध्ये जवान पाहण्यासाठी जास्त उत्सुकता होती. दरम्यान, या सगळ्यात बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरीनं शाहरुखसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. माधुरीनं ही पोस्ट शेअर करत जवान पाहण्यासाठी उस्तुक असल्याचे म्हटले आहे. 

माधुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीत माधुरीनं शाहरुखच्या जवानचा ट्रेलर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करत माधुरी म्हणाली की, शाहरुख पुन्हा एकदा तुझ्या उत्कृष्ट आणि अप्रतिम अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची प्रतिक्षा करू शकत नाही. माधुरीनं काल ही पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

madhuri dixit shares post for shah rukh khan s jawan movie post viral

माधुरी आधी कंगना रणौतनं देखील शाहरुखसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये कंगनानं शाहरुखच्या अनेक गोष्टींविषयी चर्चा करत. त्याला भारतीय सिनेमाचा देव म्हटलं आहे. मात्र, कंगनानं हा चित्रपट पाहिला किंवा ती पाहयला जाणार आहे याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. तिने या पोस्टच्या अखेरीस हॅशटॅग वापरत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

माधुरी आणि शाहरुखविषयी बोलायचे झाले तर त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचे चित्रपट आणि त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता माधुरी तिच्या सह-कलाकाराच्या मदतीसाठी पुढे आली आहे की खरंच ती ‘जवान’ पाहण्यासाठी उत्सुक आहे असा सवाल अनेकांना पडला आहे. 

हेही वाचा : ‘शाहरुख म्हणजे देव…’, कंगनाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

जवान विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. या चित्रपटाची निर्माती शाहरुखची पत्नी गौरी खान आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 70 कोटींची कमाई केली तर, वर्ल्ड वाईड 120 कोटींची कमाई केली आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *