Headlines

Lucky Number : नव्या वर्षात राशीनुसार ‘हा’ असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी

[ad_1]

Lucky Number For Rashi: जीवनात बऱ्याचदा असे काही प्रसंग घडतात ज्यावेळी आपल्याला वाटू लागतं की अमूक एक गोष्ट, तमुक एक ठिकाण किंवा मग एखादी व्यक्ती आपल्यासाठी लकी आहे. अर्थात हे सर्व घटक आपल्या नशिबाला सकारात्मक कलाटणी देणारे ठरतात असंच मत आपण बनवतो. हेच एखाद्या आकड्याविषयीसुद्धा होतं. हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच घडतं असा अनेकांचाच विश्वास असतो. चला तर मग, जाणून घेऊया 2023 मध्ये तुमच्या राशीनुसार कोणता आकडा तुमचं नशीब पालटणार आहे…. (new year Lucky Number in 2023 Accorfing to your Rashi)

मेष- 2023 या वर्षात मेष राशीच्या व्यक्तींसाठी 6 आणि 9 हे आकडे लकी असणार आहेत. चांगले निर्णय, शुभवार्ता याच दिवशी किंवा या आकड्यांशी संबंधित काहीतरी तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल. 

वृषभ – 5 आणि 6 हे आकडे या राशीसाठी शुभ आहेत. हे आकडे म्हणजे तुमचा गुडलक चार्म म्हटलं तरी हरकत नाही. हे लकी नंबर तुम्हाला अडचणींपासून दूर ठेवणार आहेत. 

मिथुन- या राशीसाठीसुद्धा 5 आणि 6 हे दोन आकडे महत्त्वाचे आणि भाग्यशाली आहेत. तुम्हाला एखादा दोन अंकी आकडा निवडायचा असेल तर तो अशा पद्धतीनं निवडा ज्याची बेरीज 5 किंवा 6 असेल. (उदा. 33, 23, 41 वगैरे)

कर्क- नव्या वर्षात तुम्हाला 2 आणि 9 हे आकडे भरभराटीच्या वाटेवर नेणार आहेत. एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही या आकड्यांना पसंती देऊ शकता. 

सिंह – 2023 मध्ये तुमच्या राशीसाठी 1,5,9 हे तीन आकडे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तुमच्यातील प्रभुत्त्व करण्याच्या क्षमतेला याच आकड्यांमुळं नवी झळाळी मिळणार आहे. 

कन्या- 5 आणि 6 हे आकडे पुढच्या वर्षभरात तुम्हाला शुभसूचक घटनांपर्यंत पोहोचवणार आहेत. हे दोन्ही आकडे कायमच तुमच्यासाठी काहीतरी सकारात्मक घेऊन येतील. 

तुळ- 5,6,9 हे तीन आकडे या राशीला नव्या वर्षात फळणार आहेत. व्यवसायामध्ये याच आकड्यांची तुम्हाला मदत होणार आहे. 

वृश्चिक- 1,2,4,7 हे आकडे तुमच्यासाठी शुभसूचक असतील. कोणत्याही बाबतीत वेळोवेळी हे आकडे तुम्हाला अनपेक्षित प्रचिती देतील. 

धनु– 3,5,6,8 हे चार आकडे, किंवा त्यांची बेरीज असणारा एकादा अंकसुद्धा तुमच्यासाठी नव्या वर्षात शुभसूचक ठरणार आहे. 

मकर- 5,6,8 हे तीन आकडे सर्वात शुभ मानले जात आहेत. नव्या वर्षात तुम्ही याच आकड्यांच्या बळावर पुढे जाणार आहात. 

कुंभ- 3,7 आणि 9 हे तीन आकडे तुमच्या राशीसाठी भाग्यांक ठरणार आहेत. उद्योगांमध्ये यश मिळण्यापासून ते अगदी नोकरीमध्ये यश मिळेपर्यंत सर्वकाही तुम्हाला या आकड्यांपासून मिळू शकतं. 

मीन- हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणात फळणारं असणार आहे. 3 आणि 7 हे आकडे किंवा ही बेरीच येणारे अंक तुम्हाला या वर्षात खूप काही देऊन जाणार आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *