Headlines

सगळं सोडून विकी कौशल भजन- किर्तनात दंग; Video पाहणारे हैराण

[ad_1]

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या आगामी चित्रपटाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, आता अखेर रक्षाबंधनाच्या निमित्ताने निर्मात्यांनी एक मोठं सरप्राईज दिलं आहे. 30 ऑगस्ट 2023 रोजी यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटाची वाट पाहणाऱ्यांना निर्मात्यांनी डबल सरप्राईज दिलं आहे. या चित्रपटातील विक्की कौशलची व्यक्तिरेखा समोर आली आहे आणि दुसरं म्हणजे चित्रपटाचं पहिलं गाणंही रिलीज झालं आहे.

यशराज फिल्म्सने आज खुलासा केला की बहुप्रतिक्षित सिंगिंग सेंसेशन, भजन कुमार, ज्याला कंपनी मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च करणार होती, या सिनेमात बॉलिवूड स्टार विकी कौशल आहे मुख्य भूमिकेत आहे. YRF च्या आगामी थिएटरिकल रिलीज द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये विकी भजन कुमार नावाच्या स्थानिक सिंगिंग स्टारची भूमिका साकारत आहे! आज विकीला भजन कुमार म्हणून समोर आणत, YRF ने TGIF चे कन्हैया ट्विटर पे आजा नावाचं पहिलं सॉन्ग देखील लॉन्च केलंय. जे विकीचे चित्रपटातील सर्वात मोठे एंट्री सॉन्ग आहे.

याविषयी बोलताना विकी कौशलने खुलासा केला, “मी आमच्या वेगळ्या कौटुंबिक मनोरंजन द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये भजन कुमार नावाच्या एका गायकाची भूमिका साकारत आहे आणि आम्ही या चित्रपटात हे पात्र साकारत असल्याची वस्तुस्थिती उघड करण्यापूर्वी आम्ही काही मजा करण्याचा निर्णय घेतला!”

पुढे बोलाताना अभिनेता म्हणाला, “एक अभिनेता म्हणून मला लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायला आवडतं आणि मला आशा आहे की मी ते साध्य करू शकेन.  मला आशा आहे की ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ मधील माझा नवीन अवतार लोकांना आवडेल. भजन कुमारला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. मला माहित आहे की मोठ्या पडद्यावर त्याला जिवंत करण्यासाठी मी माझे मन  प्राण ओतले आहे.”

‘द ग्रेट इंडियन फॅमिली’हे विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित YRF आणि विकी कौशल यांच्यातील पहिला सहयोग आहे. कन्हैया ट्विटर पे आजा हे गाणे प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ 22 सप्टेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *