Headlines

लग्नाच्या चर्चांवर साई पल्लवी संतप्त, पोस्ट शेअर करत म्हणाली…

[ad_1]

Sai Pallavi Wedding : सध्या मनोरंजन जगतात लगीनघाई सुरू आहे. एकामागे एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची लगीनघाई सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीनं लग्न केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं की तिचं लग्न झालं आहे. मात्र, हे सत्य नव्हतं आणि त्यावर आता साई पल्लवीनं प्रतिक्रिया ही दिली आहे. 

साईनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच पूर्वीचे ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट शेअर करत साईनं नेटकऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. ‘खरं सांगायचं तर, मी अफवांची पर्वा करत नाही, परंतु जेव्हा मित्र परिवाराचा एक भाग असतो, तेव्हा मला वाटतं की मला बोलायला हवे. माझ्या चित्रपटाच्या पूजा समारंभाचा फोटो वाईट हेतूने क्रॉप करून व्हायरल केला जात आहे. जेव्हा माझ्याकडे माझ्या कामाच्या आघाडीवर सामायिक करण्यासाठी खूप मोठ्या आणि आनंदाच्या घोषणा करणारे असतात, तेव्हा या सर्व गरज नसलेल्या गोष्टींसाठी स्पष्टीकरण देणं निराशाजनक असतं. अशाप्रकारे गैरसोय निर्माण करणे पूर्णपणे घृणास्पद आहे.’

साईनं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी साईच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, एक चाहता म्हणून मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहिन. दुसरा नेटकरी म्हणाला, बरं झालं तू सांगितलस. तिसरा नेटकरी म्हणाला, त्या लोकांकडे इतकं लक्ष देऊ नकोस… ते काय तुझ्यासाठी इतके महत्त्वाचे आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, साईनं दिलेल्या जबरदस्त रिप्लाय. दुसरा नेटकरी म्हणाला, शांत रहा आणि या नकारात्मकतेपासून लांब रहा. तिसरा नेटकरी म्हणाला, किती वेळा साईच्या लग्नाच्या अफवा पसरवण्यात येतात. यांना काही वाटतं कसं नाही. त्यामुळे कोणाच्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो. 

हेही वाचा : धूम- धडाक्यात नीता अंबानींनी केलं गणपतीचे विसर्जन, इनसाईड फोटो समोर

दरम्यान, साई पल्लवीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती अभिनेता नागा चैतन्यसोबत लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही अल्लू अरविंद आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन चंदू मोंडेती करणार आहेत. हा एक तेलगू चित्रपट असणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *