Headlines

लग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर

[ad_1]

Priya Bapat on Family Planning Question : लोकप्रिय मराठमोळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी ही प्रेक्षकांच्या मनाला भोवणारी आहे. ते दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. त्यांचा 13 वर्षांपासून सुखी संसार सुरु आहे. लग्नाला इतकी वर्ष झाली आणि त्यांनी अजूनही बाळाचा विचार केला नाही. नुकत्याच एका मुलाखतीत प्रियानं सतत विचारण्यात येणाऱ्या या प्रश्नावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

प्रियानं ही मुलाखत हॉटर फ्लायला दिली होती. या मुलाखतीत प्रियाला विचारलं की अनेकदा बाळाविषयी किंवा बाळाच्या प्लॅनिंगविषयी प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा त्या सगळ्यांना कसं हाताळतेस… त्यावर प्रिया उत्तर देत म्हणाली की ‘तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं? काही महिला आहेत, ज्यांना मुलं नकोयत आणि त्या जे त्यांचं आयुष्य आहे त्यात आनंदी आहेत, त्यांचं आयुष्य पूर्ण आहे, असं त्यांना वाटतं. माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट्स दिसतील. उमेशच्या फोटोवर या कमेंट्स नसतात, अर्थात मी एक स्त्री असल्याने माझ्याकडून ही अपेक्षा आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार.’ 

पुढे प्रियानं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेविषयी सांगितलं आहे. प्रिया म्हणाली, “उमेश आणि मी आम्ही एकत्र नाटक करत होतो.  त्या प्रयोगाला एक काकू आल्या आणि म्हणाल्या, ‘आम्हाला गुडन्यूज पाहिजे.’ मी म्हणाले ‘आताच तर अवॉर्ड्स मिळाले. गुडन्यूज मिळाली ना’. पण त्या म्हणाल्या ‘तू बाळ कधी करणार’. मी जोवर उत्तर देत नाही तोपर्यंत त्या तोच प्रश्न घेऊन होत्या. सतत तेच विचारत राहिल्या. शेवटी मी त्यांना म्हटलं काकू मला माझ्या आईनंही हा प्रश्न कधीच विचारला नाही, त्यामुळे प्लीज मला हा प्रश्न विचारू नका.’ खरंतर त्यावर काय उत्तर द्यायचं हे मला कळत नाही. त्यातही जर मी पोलका डॉट ड्रेस परिधान केला तर मी प्रेग्नंट आहे असं अनेकांना वाटू लागतं.” 

हेही वाचा : ‘जातीपातीला गाडण्यासाठी…’; रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

प्रियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती ‘सीटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तर लवकरच प्रिया ‘रात जवान है’ या मालिकेत दिसणार आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *