Headlines

कुशल बद्रिके, श्रेया बुगडेची ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट? कारण आलं समोर

[ad_1]

Shreya Bugade-Kushal Badrike New Hindi Show : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना विनोदी कलाकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. याच कार्यक्रमामुळे भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव हे कलाकार घराघरात पोहोचले. पण आता या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे लवकरच या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे दोघेही चला हवा येऊ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कुशल आणि श्रेयाच्या विनोदाचे असंख्य चाहते आहेत. गेल्या 9 वर्षांहून अधिक काळापासून हे दोघेही या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आहेत. पण आता कुशल आणि श्रेया दोघेही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याचे बोललं जात आहे. 

हिंदी कार्यक्रमाचा प्रोमो समोर

नुकतंच सोनी टीव्ही या वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर करण्यात आला आहे. यात एका आगामी कार्यक्रमाचा प्रोमो पाहायला मिळत आहे. ‘मॅडनेस मचायेंगे’ असं या कार्यक्रमाचे नाव आहे. या हिंदी कार्यक्रमात कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे झळकणार आहेत. या प्रोमोमध्ये कुशल बद्रिकेची झलकही पाहायला मिळाली आहे. यात तो एका पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारताना दिसत आहे. 

या वाहिनीच्या इन्स्टाग्रामवर श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके या दोघांना टॅगही करण्यात आलं आहे. त्यामुळे ते दोघेही यात झळकणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे कुशल आणि श्रेया ‘चला हवा येऊ द्या’ मधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण त्या दोघांनीही याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.  

‘मॅडनेस मचायेंगे’ हा नवा कार्यक्रम ‘कपिल शर्मा शो’ च्या जागी सुरु होणार असल्याची माहिती आहे. पण हा कार्यक्रम नेमका कधी सुरु होणार, याची वेळ काय असणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमा कुरेशी करत असल्याचे दिसत आहे. तिच्यासोबत प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजरालही दिसत आहे. या कार्यक्रमात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव दुबे, केतन सिंग, अंकिता श्रीवास्तव, पारितोष त्रिपाठी, स्नेहिल मेहरा, इंदर सहानी हे विनोदवीर देखील झळकणार आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *