Headlines

kirit somaiya alligation on kishori pednekar sra scam spb 94

[ad_1]

एसआरए घोटाळ्या प्रकरणी दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेते किशोरी पेडणेकर यांच्या जोरदार टीका केली आहे. मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी करत एसआरएमध्ये सदनिका मिळवल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा – एसआरए घोटाळा: “…तर मी स्वत: गाळ्यांना टाळं लावते,” पेडणेकरांच्या विधानावर सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…”

काय म्हणाले किरीट सोमय्या?

”एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना दादर पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. जर त्यांनी काहीही चुकीचे केले नाही, त्या या चौकशीला का घाबरत आहेत? ठाकरे सरकार असताना मी या प्रकरणाचे सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिले होते. तसेच वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्याचे पुरावेही दिले होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे त्यांची चौकशी झाली नाही”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा – एसआरए घोटाळा: किशोरी पेडणेकर अडचणीत? दादर पोलिसांकडून पुन्हा समन्स, चौकशीसाठी हजर होण्याचा आदेश

एसआरएमध्ये बनावट स्वाक्षऱ्या करत सदनिका बळकावल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांवर केला आहे. ”गोमाता जनता एसआरए वरळी येथे सदनिका बळकावण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली असून त्यांच्या कुटुंबातील कदम यांनी मूळ लाभार्थी संजय अंधारी यांच्या नावाने स्वाक्षरी करत खोटी कागदपत्रे सादर केली”, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ”काल रात्री मी या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तसेच एसआरएचे मुख्यकार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. त्यांनीही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या घोटाळ्यासह करोना काळात केलेला घोटाळा असेल किंवा बेनामी संपत्ती प्रकरण असेल, या सर्व प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करावी”, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *