Headlines

किरण रावमुळं झाला रिना दत्ता- आमिर खानचा घटस्फोट? 19 वर्षांनी खुलासा

[ad_1]

Kiran Rao on Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो. अलीकडेच आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने एक खुलासा केला आहे. किरण राव आणि आमिर खान यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. या सगळ्या चर्चांवर तिने आज पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे.       

2000 मध्ये लगान चित्रपटाच्यावेळी आमिर खान आणि किरण राव डेट करत असल्याची चर्चा होती. आमीरनेने त्याची पहिली पत्नी रीना दत्तसोबत घटस्फोट घेतला. मात्र, किरण रावने या आरोपांचे खंडन केले आहे. या अफवा खोट्या असल्याचे तिने म्हटलं आहे. अलीकडेच तिने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. त्यात तिने यावर स्पष्ट उत्तरे दिली आहेत. 

किरण रावने म्हटलं आहे की, लगान (2001)मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, तेव्हा ते एकमेकांना डेट करत नव्हते. खूप जण असा विचार करतात की, आमिर खान आणि मी लगानपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. मात्र तसं अजिबात नाहीये. आमिर आणि मी स्वदेश (2004) च्यावेळी एकत्र आलो. तेव्हा ते मंगल पांडे चित्रपटाचे शूटिंग करत होता. 

किरण राव पुढे म्हणते की, आम्ही कोकच्या जाहिरातीसाठी आशुतोष गोवारिकर यांच्यासोबत शुटिंग करत होतो. इथेच माझी आणि आमिरची जास्त ओळख झाली. हे सर्व लगाच्या 3-4 वर्षांनंतर झाले. लगानच्या दरम्यान मी त्याच्या अजिबात संपर्कात नव्हती. लगानच्या वेळी आम्ही फार बोलतही नसायचो. खरं तर त्यावेळी मी दुसऱ्याच कोणालातरी डेट करत होते. 

आमिर आणि मी 2004 साली बाहेर जाण्यास सुरुवात केली तेव्हा एकमेकांबद्दल विचार करण्यास सुरुवात केली. आमच्या डेटिंगमुळं त्याचा घटस्फोट झाला, या अफवा खऱ्या नाहीयेत, असं किरण रावने म्हटलं आहे. 

किरणने पुढे म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न करता जो आधीपासून दुसऱ्या नात्यात आहे. तेव्हा भुतकाळचे ओझेही तुमच्यासोबत येत असते. त्यामुळं आमिर आणि मी आम्ही कपल काउसिंलिंग केलं होतं. तिथे आम्ही एकमेकांच्या गरजांवरती बोललो होतो आणि हे आमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरले होते. यामुळं आम्हाला नात्यात पुढे जायला मदत मिळाली. 

आमिर खानने 1986 साली रीना दत्तासोबत लग्न केले होते. दोघांना दोन मुलंदेखील आहेत. आयरा खान आणि जुनैद. अलीकडेच आयराने नुपूर शिखरेसोबत लग्न केले होते. तर, जुनैद लवकरच कलाविश्वात परार्पण करु शकतो. आमिरने लग्नाच्या 16 वर्षांनंतर घटस्फोट घेतला होता. त्यानंतर 2005मध्ये त्याने किरण रावसोबत दुसरा संसार थाटला होता. या दोघांना एक मुलगादेखील आहे. ज्याचा जन्म सरोगसीने झाला आहे. मात्र, काही वर्षांनी त्यांच्याही नात्यात दरी निर्माण झाली आणि 2021मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही दोघे अजूनही एकमेकांसोबत काम करतात. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *