Headlines

‘तुझ्या पोराला ड्रग्स प्रकरणात अडकवून…’, किरण मानेनीं पोस्ट करत केलं शाहरुखच्या ‘जवान’च प्रमोशन!

[ad_1]

Kiran Mane Shah Rukh Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर सक्रिय असणारे किरण माने हे नेहमीच ज्या विषयावर त्यांना मत मांडायचे असेल ते स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता देखील किरण माने हे त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि त्याच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटासाठी केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. 

किरण माने यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी शाहरुखचा उल्लेख करत त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ते म्हणाले की ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर !’ अग्ग्गाय्यायायाया… अख्ख्या देशानं घरात बसल्या-बसल्या शिट्ट्या वाजवल्यात भावा! पिच्चर आल्यावर काय हुईल शारख्या? तू हायेसच भन्नाट, जबराट, नादखुळा. …तुझ्यावर जळनार्‍यांनी लै अफवा पसरवल्या दोस्ता, पन तू मागं हटला नाहीस…. ट्रोलर्सच्या झुंडीनं तुला लै ट्रोल केला, लै हेटाळनी केली, पन तू भिडलास, नडलास, जिंकलास. …तुझ्या पोराला अडकवून तुला झुकवन्याचा प्रयत्न झाला, पन तू तर ‘बाजीगर’ ! गप र्‍हावून बाजी पलटलीस. परत ताठ कण्यानं, उंच मानेनं उभा र्‍हायलास. भक्कम. पाय रोवून. तुझी ती ‘कातिल’ नजर रोखून. आजबी तुझ्या ‘मन्नत’पुढं रोज अख्ख्या भारतातनं तरूण पोरंपोरी येऊन उभी र्‍हात्यात… तासनतास तुझ्या घराकडं बघत बसत्यात… त्यांना तुझ्या जातीधर्माशी घेनंदेनं नसतं. कारन ते तुझ्यासारखेच ‘अस्सल’ भारतीय असत्यात. तुझी एक झलक दिसली तर आनंदानं नाचायला लागत्यात…येडी होत्यात.’

पुढे किरण माने म्हणाले की ‘जगातला सगळ्यात लोकप्रिय कलाकार हायेस तू. तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस, तर ‘मानूस’ म्हनूनबी तू ‘किंग’ हायेस ! ॲसिड ॲटॅक झालेल्या हजारो महिलांची आयुष्य उभी करून दिलीयस तू. नानावटी हॉस्पीटलमध्ये लहान मुलांच्या कॅन्सरसाठी तू जो वॉर्ड उभा केलायस त्यानं कित्येक चिमुरड्यांचे जीव वाचवलेत. तुझ्या अशा लै लै लै समाजोपयोगी कामांची जगभर दखल घेतली गेली हाय. युनेस्को अवॉर्ड मिळवलंयस. साऊथ कोरीयापास्नं इंग्लंडपर्यन्त अनेक देशांनी यासाठी तुला सन्मानित केलंय. त्यासाठी या देशातल्या प्रत्येक सच्च्या नागरीकाला तुझा अभिमान वाटतो !’

हेही वाचा : समांथाला का नाही आणलं? सासरे नागार्जुन यांनी थेट विजयलाच विचारला प्रश्न

किरण माने पुढे पठाणचा उल्लेख करत म्हणाले की ‘पठाणच्या वेळी याच आपल्या खर्‍या देशानं दाखवून दिलं की, थयथयाट करत सेलिब्रिटींना शिवीगाळ करणार्‍या छितपूट ट्रोलर्सच्या पलीकडं, बहुसंख्य जनता आहे जी शांत असते, पन मानवतेच्या प्रसारासाठी निधड्या छातीनं लढनार्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी असते. पठाण सिनेमा म्हनून लै बरा नव्हता. तुझ्या ट्रोल्सना सनसनीत उत्तर म्हनून पब्लीकनं डोक्यावर घेतला. द ग्रेट, वन ॲन्ड ओन्ली शाहरूख खान, आता तुझा ‘जवान’ मात्र लै भारी असनार. लै आतुरतेनं वाट बघतोय. ये लवकर भावा… होऊ दे जाळ न् धूर संगट… चिखलात धुरळा, पान्यात आग काढ… आम्ही आहोत तुझ्यासोबत. बघनार. ‘पठाण’सारखा परत परत बघनार. लब्यू भावा.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *