Headlines

किंग खानला मोठा झटका! शाहरूखचा ‘जवान’ सिनेमा HD मध्ये लीक; ‘या’ साईटवरून केला जातोय डाऊनलोड

[ad_1]

Jawan Leaked Online : बॉलिवूड किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट आज रिलीज (Jawan  Movie) झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला (Jawan Break Record) सुरुवात केली आहे. फक्त भारताच नव्हे तर विदेशात देखील जवानचा जलवा पहायला मिळत आहे. थेटरच्या बाहेर रांगच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत असतानाच आता धक्कादायक माहिती मिळालीये. किंग खानचा जवान प्रदर्शनाआधीच लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता निर्मात्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी जवान हा चित्रपट मोठ्या थाटात थिएटरमध्ये लॉन्च केलाय. मात्र, पुन्हा पायरसीचा दणका सिनेमाला बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जवान’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन साइटवर उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे आता किंग खानचं टेन्शन वाढलंय.

कोणत्या साईट्सवर उपलब्ध?

तमिलरॉकर्स, Mp4movies, Vegamovies आणि Filmyzilla सारख्या अनेक साइट्सवर हा चित्रपट फुल एचडी प्रिंटमध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे याचा थेट फटका जवानच्या टीमला बसणार आहे. मात्र, शाहरुखचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांचा थेटरकडील ओघ काही कमी झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे ही एक निर्मात्यांसाठी समाधानाची बाब आहे. येत्या आठवड्यात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल यात काही शंकाच नाही.

तीन वर्षांची जेल…

सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा, २०२३’ राज्यसभेत पास केला होता. या कायद्यातील सुधारणेमुळे चित्रपटांची पायरसी आणि त्याचबरोबर चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या सेन्सॉर बोर्डाच्या पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जे लोक चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करतील, त्यांना तीन वर्षांचा कारावास आणि चित्रपटाच्या निर्मितीच्या एकूण खर्चापैकी पाच टक्के दंड, अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीच ठरवा सिनेमा कुठे पाहायचा?[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *