Headlines

‘किमान पाठीमागे लटकवलेली जिन्स तरी काढायची’, चाहत्याच्या कमेंटला हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर, म्हणाली ‘तुम्ही पुढे…’

[ad_1]

Hemangi Kavi Reply To Trollers : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. ती सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सध्या हेमांगी ही एका हिंदी मालिकेत झळकत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे तिच्या हिंदी मालिकेचे नाव आहे. यात ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. हेमांगीने नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या सर्वच माध्यमांत काम केले आहे. आता  हेमांगीने तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलरचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हेमांगी ही इन्स्टाग्रामवर सतत व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. आता हेमांगीने इन्स्टाग्रामवर एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती राती अर्ध्या राती या गाण्यावर रील करताना दिसत आहे. 

हेमांगी कवीच्या रीलवर चाहत्याची कमेंट

हेमांगी या व्हिडीओत भवानी चिटणीस या पात्राच्या वेशात नाचताना दिसत आहे. तिने तिचा हा व्हिडीओ सेटवर शूट केला आहे. यावेळी तिच्या चेजिंग रुममध्ये एका हँगरला जिन्स आणि टीशर्ट लटकवल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तिची बॅगही यावेळी दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. 

“मॅडम किमान तुमच्या मागे भिंतीवर लटकवलेली जिन्स तरी काढून टाकायची होतीस”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर तिने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. “तुम्ही मागे लक्ष देण्यापेक्षा पुढे लक्ष द्या”, असे हेमांगी म्हणाली आहे. त्यावर त्याने “माझे लक्ष तर तुमच्याच कडे असते”, असे म्हटले आहे. हेमांगी आणि त्या ट्रोलरच्या संभाषणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Hemangi kavi trolling

हेमांगी सिनेसृष्टीत सक्रीय

दरम्यान हेमांगी ही सध्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत झळकत आहे. ही मालिका झी टीव्ही या हिंदी वाहिनीवर झळकत आहे.  यात ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. याआधीही तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकेत काम केले आहे. हेमांगी ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये झळकली. ती अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ताली वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *