Headlines

विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्या महिलेची…” | Supriya Sule comment on allegation of Molestation on Jitendra Awhad resignation

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा झाला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ७२ तासात दोन खोटो गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचं सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषण केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.

सुप्रिया सुळे म्हणाले, “माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, राजीनामा हे यावरचं उत्तर नाही. ते एक भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण, ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत.”

“आव्हाडांकडे आदर्श आमदार म्हणून बघितलं जातं”

“मुंब्राच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे. ते मुंब्र्यात अतिशय चांगलं काम करत आहेत. मंत्री असो किंवा नसो, मात्र आदर्श आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये,” अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली.

“राजकारणाच्या पातळीची मला चिंता वाटते”

“राजकारण ज्या पातळीवर जात आहे याची मला चिंता वाटते. हे फक्त कुठला पक्ष म्हणून नाही, तर राजकीय क्षेत्रातील सर्व लोक म्हणून याकडे माणूसकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घडली”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “मी तो व्हिडीओ पाहिला. एकदा नाही, तर चार ते पाचवेळा पाहिला. कारण मीही एक महिला आहे. एक महिला जेव्हा तक्रार करते तेव्हा मी अगदी तटस्थपणे त्या महिलेच्या तक्रारीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ही घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घडली. व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ हे घडल्याचं दिसत आहे. तिथं प्रचंड गर्दी होती. कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला प्रचंड पोलीस यंत्रणा असते. पोलिसांचा एवढा मोठा ताफा, उत्साही कार्यकर्ते, सहकारी कार्यक्रमाला आले होते.”

व्हिडीओ पाहा :

“त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला?”

“जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत माझे सहकारी श्रीकांत यांनाही हात लावला आणि बाजूला केलं. तसेच त्यांनी समोरून येणाऱ्या त्या महिलेलाही बाजूला केलं. त्यामुळे नेमका विनयभंग कसा झाला हे कळत नाही. हे गैरसमजातून आणि चुकीच्या संवादातून झालं आहे असं मला वाटतं,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात” म्हणणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यावर भाजपाचा हल्लाबोल, म्हणाले, “सुप्रिया सुळे तुमच्या…”

“त्या महिलेची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे”

“असं असलं तरीही त्या महिलेची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे. मात्र, लगेच पोलीस स्टेशनला जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचं टोकाचं पाऊल उचलणं किती योग्य याचा सर्वांनी शांतपणे विचार करायला हवा,” असंही त्यांनी नमूद केलं.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *