Headlines

‘झिम्मा २’चा धुमाकूळ; पहिल्या तीन दिवसांत केली बक्कळ कमाई

[ad_1]

मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.  ‘झिम्मा 2’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 

चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात,  ‘प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे. 

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  झिम्माप्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. मराठी प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होताच प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करताना दिसत आहेत. सगळीकडे या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत. 

नुकताच रिलीज झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. २४ नोव्हेंबरला रिलीज झालेला झिम्मा २ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लॉकडाऊननंतर रिलीज झालेला झिम्मा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.या सिनेमात प्रत्येक कलाकाराने सुंदर अभिनय केला आहे. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. यांच्यावर चित्रित झालेलं मराठी पोरी हे गाणे या सात जणींना या सहलीत पुन्हा एकदा स्वतःची एक वेगळी ओळख करून देत आहे.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *