Headlines

‘नो एण्ट्री 2’ चित्रपटात झळकणार 10 अभिनेत्री, तिघींची नावे समोर

[ad_1]

No Entry 2 Movie Star Cast : सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नो एण्ट्री’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉलिवूडच्या सुपरहिट कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. काही दिवसांपूर्वी निर्माते बोनी कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘नो एण्ट्री’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी या चित्रपटात तब्बल 10 अभिनेत्री झळकणार असल्याचे सांगितले होते. आता यातील काही अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. 

‘नो एण्ट्री’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. तर या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बोमन ईरानी हे कलाकार झळकले होते. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते बोनी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी याबद्दलची माहिती दिली होती. 

10 अभिनेत्रींपैकी तिघींची नावे समोर

“आम्ही या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत ‘नो एण्ट्री 2’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहोत. यात वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यासोबतच या चित्रपटात 10 अभिनेत्रीही असणार आहेत”, असे बोनी कपूर यांनी सांगितले होते. आता यातील 3 अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. 

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात झळकणाऱ्या 10 पैकी 3 अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. यात पहिले नाव हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आहे. त्यासोबतच क्रिती सेनॉन आणि मानुषी छिल्लर या दोघीही यात झळकणार असल्याचे बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बोनी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटात वरुण धवन, अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत असतील असे सांगितले होते. विशेष म्हणजे यात हे सर्व कलाकार डबल रोलमध्ये झळकणार आहेत. त्यासोबतच यात 10 अभिनेत्री झळकणार असून या चित्रपटासाठी कोणकोणत्या अभिनेत्री योग्य ठरतील याची चाचपणी करत असल्याचे म्हटले होते.

पहिल्या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद

दरम्यान ‘नो एण्ट्री’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिले होते. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले होते. तर या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. या चित्रपटात सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, बिपाशा बासू, ईशा देओल, लारा दत्ता, सेलिना जेटली आणि बोमन ईरानी हे कलाकार झळकले होते.  [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *