Headlines

‘जे पोटात तेच ओठात!’ शिवानी सुर्वेच्या रोखठोक स्वभावावर कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1]

मुंबई : अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेमहीच चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याने एका अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्याने अभिनेत्री शिवानी सुर्वेसाठी शेअर केली आहे. यामध्ये कुशल त्याच्या मैत्रिणीसाठी व्यक्त झाल्याचं दिसत आहे. देवयानी मालिकेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिच्या स्पष्ट स्वभावासाठी ओळखली जाते.

कुशलने ही पोस्ट शिवानीच्या वाढदिवसा निमीत्त शेअर केली आहे. नुकताच अभिनेत्रीने तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. ही पोस्ट शेअर करत कुशलने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, Big-boss ह्या कार्यक्रमातून दिसलेली स्वतःच्या हक्कांसाठी राडा घालणारी, “शिवानी” आणि सिनेमाच्या shooting च्या निमित्ताने मला भेटलेली, प्रेमळ, मस्तीखोर, सतत नव्याच्या शोधात असलेली आणि जगाचे नियम मोडून आनंदी राहण्याची धमक असलेली.

“शिवानी” ह्या दोन्हीही तिच्याच personality आहेत. आता ते आपल्या वागण्यावर depend करतं की कोणती शिवानी आपल्याला भेटणार. पण एक गोष्ट महत्त्वाची की तिच्या दोन्ही personality खऱ्या आहेत, तिला फार काही खोटं वागता येत नाही. जे पोटात तेच ओठात ! जगात खूप कमी माणसं अशी आहेत. @iam_shivanisurve आहेस तशीच रहा कायम .Happy birthday yaar थोडंस्स उशिरा.

अनेकांनी कुशलच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवानीने कुशलच्या पोस्टवर रिप्लाय देत म्हटलंय की, thank you so much किती छान बोल्लास तु थँक्यू. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, तिच्या शिव्या बिग बॉस मधे ऐकल्या आहेत आम्ही happy birthday by the way. तर अजून एकाने लिहीलंय, आता कथ्थक आहे घरी गेल्यावर. तर अनेकांनी शिवानीला या फोटोच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या कुशल बद्रिकेची ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कुशल हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. कुशलला कॉमेडीचा किंग म्हणून ओळखलं जातं. फु बाई फू मधून कुशल घरा घरात पोहचला मात्र कुशलला खरी ओळख मिळाली ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून. कुशल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमीच हा अभिनेता त्याच्या चाहत्यांना आपल्या लिखाणातून प्रभावित करत असतो. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *