Headlines

jayant-patil criticizes Shinde Fadnavis government over cabinet expansion

[ad_1]

मंंत्रीपद मिळाले नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार फुटतील या भीतीतूनच मंत्रीमंडळ विस्तार रखडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शुक्रवारी ते सांगलीत पत्रकार बैठकीत बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असे सांगत असले तरी जोपर्यंत मुख्यमंत्री याबाबत घोषणा करीत नाहीत तोपर्यंत यामध्ये तथ्य आहे असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा- “जाऊ द्या, जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”, अजित पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला!

मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर उर्वरित आमदार पुन्हा ठाकरे यांच्याकडे परततील यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ कमी होण्याची भीती असल्याने मंत्रीमंडळ विस्तार टाळला जात आहे. आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वादावरही जयंत पाटलांनी भाष्य केलं आहे. बच्चू कडू यांच्यावर  झालेल्या आरोपामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नवल वाटण्यासारखे काही नाही. खोके घेतल्याचा आरोप होउनही कडू गप्प का बसले आहेत ? त्यांनी ठामपणाने भूमिका घेतली नसल्याने राणा यांनी केलेल्या आरोप चुकीचा वाटत नसल्याचे दिसते, असेही पाटील म्हणाले

हेही वाचा- “नारायण राणेंची किंमत आताच्या घडीला चार आण्याची”

प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने बेरोजगार युवकामध्ये निराशा  निर्माण झाली आहे. जे सरकारमध्ये आहेत त्यांच्यावरच उद्योग टिकविण्याची जबाबदारी आहे. सरकार करीत असलेली पोलीस भरती आमच्या सरकारनेच जाहीर केलेली असून या सरकारने नव्याने काही केलेले नाही. सामना अग्रलेखातून कटूता संपवा, कामाला लागा असे म्हटले यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  साद घातली असा अर्थ नसून चार महिने सत्ता हाती येउनही विकास कामाबाबत सरकार गंभीर नसून आता राज्यकारभार करावा असा सा यामागे आहे असेही  आ. पाटील म्हणाले. राष्ट्रवादी मंथन- वेध  भविष्याचाया शिबीराचे ४ व ५ नोव्हेंबर रोजी  शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असून या शिबीरामध्ये केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर, महागाई, माध्यमांची मुस्कटदाबी यासह देशातील अनेक विषयांवर विचारमंथन होणार असल्याचे पाटील म्हणाले.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *