Headlines

जबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये ‘जवान’ पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स

[ad_1]

Hemangi Kavi Dance on Jawan: सध्या ‘जवान’ या चित्रपटाची तूफान चर्चा आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यातून शाहरूखचे अनेक सेलिब्रेटी चाहतेही यावेळी त्याच्यावर तूफान प्रेम करताना दिसत आहेत. त्यामुळे शाहरूखच्या या फॅन्सहीची चांगली चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी अभिनेता शरद केळकर यानं शाहरूख खानचा ‘जवान’ हा चित्रपट थिएटरच्या पायरीवर बसून पाहिला होता. त्यामुळे यावेळी त्याच्या यावेळी जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा शाहरूख खानच्या अशाच एका सेलिब्रेटी डाय हार्ट फॅननं भरगच्च भरलेल्या थिएटरमध्ये जवान चित्रपट सुरू असताना डान्स केला आहे.

त्यामुळे तिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिनं इन्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही डाय हार्ट फॅन दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री हेमांगी कवी आहे. हेमांगी इन्टाग्रामवर स्टोरीवर आपला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळीही तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. 

हेही वाचा : ‘मीस यू मेरा बच्चा’, कोणाच्या मृत्यूनं खचला अर्जून कपूर?

सोशल मीडियावर हेमांगी ही सतत एक्टिव असते. त्यामुळे तिची चर्चा रंगते. अनेकदा ती आपल्या भावना, अनुभव खुलेआपपणानं आणि फारच निर्भिडपणे व्यक्त करताना दिसते. त्यातून सध्या तिची चर्चा रगंलेली आहे ती म्हणजे तिच्या हटके फोटोशूटमुळे. जवान हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. गेल्या आठवड्याभरात या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे यावेळी चर्चा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त शाहरूख खानची. पठाणसारख्या चित्रपटाला हा चित्रपट तगडी मात देणार असं दिसतंय. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

यावेळी हेमांगीचा डान्स पाहून सोशल मीडियावर तिचीच चर्चा आहे. यावेळी तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, हेमांगी हाऊसफुल्ल थिएटरमध्ये मागच्या सीटवर बसून डान्स करताना दिसते आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, मी स्वत:ला थांबू शकत नाही, आणि खाली शाहरूख खान आणि अटली कुमार यांना टॅग केले आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटातून अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेही समोर आली आहे. तेव्हा तिच्या अभिनयाचेही तिनं कौतुक केले आहे. तिचाही चित्रपटातला एक फोटो शेअर करत तिचेही कौतुक केले आहे. त्यामुळे तिचीही जोरात चर्चा सुरू आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *