Headlines

शाहरुखच्या ‘जवान’चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

[ad_1]

सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दोन दिवसात दोनशे कोटींचा गल्ला जमवणारा सुपरस्टार शाहरुख खानचा जवान हा चित्रपट चित्रपट गृहात गर्दी खेचतोय. 7 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला जवान प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. मात्र हा चित्रपट.वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे पुण्याशी खास नाते आहे. या चित्रपटातील एका सीनचे शूटींग पुण्यातील मेट्रोमध्ये झाले आहे. या संदर्भात खुद्द मेट्रो प्रशासनानेच ट्विट करत माहिती दिली आहे. शाहरुख खान म्हटलं की चित्रपटात काही तरी वेगळे पण असते. शाहरुखच्या पठाणने देखील प्रेक्षागृहात धुमाकूळ घालत जोरात कमाई केली होती. त्याच प्रमाणे जवानने देखील पहिल्याच दिवशी शंभर कोटींच्या वर कमाई केली आहे.

पुण्यातील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकात आणि मेट्रो ट्रेनमध्ये जवान चित्रपटाचे काही सीनचे शूटिंग झाले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच मेट्रोमधील तो खास सीन दाखविण्यात आला आहे. शाहरुख खान आणि काही महिला मेट्रो हायजॅक करताना दिसत असून हे शूटिंग मेट्रो स्टेशनवर करण्यात आलं आहे.

याबाबत मेट्रो प्रशासनाने अधिकृत आपल्या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. ट्विट मध्ये म्हंटले आहे की, जवान चित्रपटाचं शुटींग 2021 मध्येच झाले आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चित्रीकरणासाठी पुणे मेट्रोची निवड होणं हे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी खरचं अभिमानाची बाब आहे. 

पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ”जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.त्यामुळे या चित्रपटाचे पुण्याशी खास नाते निर्माण झाले आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओके हिने देखील याबाबत माहिती दिली आहे.

चित्रपटानं मोडले विक्रम

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईके आकडे झपाट्यानं वाढताना दिसले. पहिल्या चार दिवसांमध्ये शाहरुखच्या या चित्रपटानं तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा गल्ला जमवसाय पण, पाचव्या दिवशी मात्र कमाईचा वेग काहीसा मंदावला. 300 कोटींच्या घरात येणार्या शाहरुखच्या या चित्रपटानं 4 विक्रमही मोडले. बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार किंग खानच्या चित्रपटानं पाचव्या दिवशी 30 कोटींची कमाई केली. आठवड्याची सुरुवात आणि त्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना याचा प्रभावही चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिसून आला. ज्यामुळं कमाईच्या आकड्यांत काहीशी घट झाली. सध्या हे आकडे 282.08 कोटींपर्यंत पोहोचले असून, आतापर्यंत त्यात मोठी भर पडल्याचीही शक्यत आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *