Headlines

It Happens only in India: संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री, तर धोतर-कुर्त्यावर फिल्डिंग; पाहिला का भन्नाट सामना?

[ad_1]

Cricket News : भारतामध्ये क्रिकेट (Indian Cricket team) हा खेळ अनेकांसाठी सर्वस्व आहे. म्हणजे हा खेळ खेळता येत नसला तरीही त्याचा आनंद घेण्यासाठीही हातातली कामं बाजूला ठेवणारीही बरीच मंडळी तुमच्या ओळखीत असतील. अशा या क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या कमाल खेळासोबतच आणखीही काही गोष्टी पाहण्याजोगा किंबहुना ऐकण्याजोग्या असतात. कॉमेंट्रीसुद्धा त्याचाच एक भाग. व्हीहीएस लक्ष्मण (VVS Laxman), हर्षा भोगले (Harsha Bhohgle), ब्रेट ली (bret lee), यांच्या कॉमेंट्री ऐकणं क्रिकेटप्रेमींसाठी (Cricket Commentry) पर्वणीच असते. पण, आता त्यांचीही लोकप्रियता फिकी पडेल, कारण भारतात चक्क संस्कृत भाषेमध्ये (Sanskrit Language) क्रिकेटची कॉमेंट्री करण्यात येत आहे. (have you ever saw Cricket In Dhoti Kurta Commentary And Umpiring In Sanskrit it happens only in bhopal )

तुम्ही आतापर्यंत श्लोकांमध्ये किंवा वेद- पुराण आणि फारफारतर शालेय अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत भाषेचा वापर ऐकला असेल. भारतातच पाळंमुळं असणाऱ्या आणि भाषांमध्ये अग्रगणी असणाऱ्या याच संस्कृत भाषेचा अनोखा वापर सध्या सुरुये (Bhopal) भोपाळमध्ये. इथं नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या महर्षी चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हा अनोखा अंदाज संपूर्ण देशाचं लक्ष वेधून केला. 

भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळाडूंच्या जर्सीपासून ते अगदी सामन्यातील (Umpairing) अंपायरिंग आणि कॉमेंट्रीमध्येही एक नवा टच पाहायला मिळाला. हा टच होता संस्कृत भाषेचा. या क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंनी जर्सी म्हणून धोतर आणि कुर्ता असा पारंपरिक वेश केला होता. बरं, या वेशात ते सराईताप्रमाणं खेळत होते ही काय ती कौतुकाची बाब. आता इथं मध्येच कॉमेंट्रीही झाली… ‘अयं च षड्जः|’. हे एकून प्रथमत: अनेकांचे डोळे चमकले. पण, नंतर लक्षात आलं अरेच्छा! हा तर षटकार होता. 

कर्मकांडी ब्राह्मण समाजाचे अभिषेक दुबे आणि अंकुर पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडणाऱ्या या स्पर्धेनी क्रिकेटला वेगळ्याच रुपात सादर केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, Magnificent shot, beautifully played या शब्दांऐवजी इथं चक्क ‘भव्यं शॉट्’ आणि तत्सम शब्द वापरले जात आहेत. कमाल आहे ना? 

काय आहे या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतू? 

वैदिक ब्राह्मण खेळांचा प्रचार आणि संस्कृत भाषेचं संवर्धन या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे या स्पर्धेचं आजोयन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. बरं, येत्या काळात मध्य प्रदेशमध्ये फक्त क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळ संस्कृत भाषेच्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. तुम्हाला आवडेल का अशा असे खेळ पाहायला ? [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *