Headlines

‘व्यक्ती सनातनी आहे की नाही हे पाहण्यासाठी…’, केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1]

Ketaki chitale Instagram Post : मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ती कायमच विविध विषयांवर भाष्य करत असते. यामुळे अनेकदा केतकीवर टीकाही होते. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर आता केतकीने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

केतकी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच विविध विषयांवर भाष्य करताना दिसते. नुकतंच केतकीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर तिने एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत नावात बदल करण्याबद्दलचा मजकूर लिहिण्यात आला आहे. 

वृत्तपत्राच्या कात्रणात नेमकं काय?

“माझे जुने नाव मोहम्मद सलीम उमर असे होते. ते बदलून नवीन नाव मधुकर सदाशिव कुलकर्णी असे केले आहे. गॅझेट नंबर पी 2383460, दिनांक 21 डिसेंबर 2023” असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. आता याबद्दल केतकीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यावर तिने सडकून टीका केली आहे. 

केतकी चितळे काय म्हणाली?

“आता फक्त आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड नाही, तर जन्माचे सर्टिफिकेट, शालेय दाखले व पुरावे आणि जन्मपत्रिका (जुळवाजुळव करायला नाही, व्यक्ती सनातनी आहे की नाही) देखील बघायला सुरुवात करा. प्रेम चार दिवस राहते, मग ते नाते टिकवण्यासाठीचा लढा असतो. त्यामुळे डोळे झाकून प्रेमावर विश्वास ठेवणे बंद करा. जय हिंद, वंदे मातरम्, भारत माता की जय”, अशी पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ketaki chitale Post

दरम्यान, केतकी चितळे ही सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’ या मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ती झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या लोकप्रिय मालिकेतही झळकली. त्याबरोबरच केतकी हिंदीमधील सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या मालिकेतही काम केले होते.

‘व्यक्ती सनातनी आहे की नाही हे पाहण्यासाठी…’, केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *