Headlines

IPL 2023 Retention : मुंबई इंडियन्सचा Arjun Tendulkarबाबत मोठा निर्णय

[ad_1]

मुंबई :  आयपीएलच्या 16  व्या मोसमासाठी (IPL 2023) लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक संघाने कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या  सर्व खेळाडूंची रिटेन्शन यादी जाहीर झाली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एकूण 13 खेळाडूंनी रिलीज म्हणजेच करारमुक्त केलंय. तसेच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतही (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायजीने मोठा निर्णय घेतलाय. (ipl 2023 retention mumbai indians retention and released players list know what about arjun tendulkar)

मुंबईने अर्जुनला संघात कायम ठेवलंय. अर्जुनला आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) मुंबईने 20 लाख या बेस प्राइजमध्ये आपल्या गोट्यात घेतलं होतं. त्यानंतर 15 व्या मोसमात (IPL 2022) अर्जुनसाठी मुंबईने  10 लाख अधिकचे मोजून त्याला आपल्याकडे कायम ठेवलं. मात्र अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे यंदा तरी अर्जुनला आयपीएल डेब्यूची संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मुंबईने कायम राखलेले खेळाडू 

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, हृतिक शोकीन, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अर्शद खान, टिळक वर्मा, रमणदीप सिंग, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स आणि आकाश मधवाल.  

मुंबईने करारमुक्त केलले खेळाडू 

किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंह, आर्यन जुयाल, बासिल थंपी, डॉनियल सॅम्स, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मयंक मर्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, राइल मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *