Headlines

IPL 2023 Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा ‘बिग शो’ राहणार की जाणार? भज्जी म्हणतो…

[ad_1]

IPL 2023 Retentions: आगामी आयपीएल 2023 म्हणजेच 16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) येत्या 23 डिसेंबरला कोची इथे होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन (IPL 2023 Retentions) आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्या, असे निर्देश बीसीसीआयकडून देण्यात आले आहेत. अशातच आता यादी जाहीर होण्याआधी काही खेळाडूंची नावं जाहीर समोर आली आहे. (IPL 2023 Retentions mumbai indians like to Released Kieron Pollard in  Mini Auction)

पाच वेळची चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंची नावं समोर येत आहेत. यामध्ये फेबियन एलन, कायरन पोलार्ड, टाइमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि ऋतिक शौकीन या खेळाडूंची नावं (Released players from Mumbai Indians) आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा बिग शो मानल्या जाणाऱ्या कायरन पोलार्डचं (MI Released Kieron Pollard) नाव ऐकताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कायरन पोलार्ड राहणार की जाणार?, असा सवाल उपस्थित केला जात असतानाच एमआयचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhjan Singh on Kieron Pollard) मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला हरभजन सिंह?

मला वाटतं कायरन पोलार्डला (Kieron Pollard) सोडणं मुंबई इंडियन्ससाठी (MI) खूप कठीण जाणार आहे. तो अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्समध्ये खेळतोय. पण, काही वेळा तुम्हाला काही अवघड निर्णय घ्यावे लागतील आणि कदाचित हीच वेळ असेल, असं हरभजन म्हणाला. पुढचा विचार करा आणि पुढील 4-5 वर्षांसाठी एक संघ बनवा आणि पोलार्डने गेल्या काही वर्षांत जे काही केले ते करू शकेल असा कोणीतरी शोधण्याचा प्रयत्न करा, असं सल्ला देखील हरभजनने मुंबई इंडियन्सने दिला आहे.

आणखी वाचा- IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

दरम्यान, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डेनियल सॅम्स, टिम डेविड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा या खेळाडूंना मुंबई इंडियन्स रिटेन (Retained player of Mumbai Indians) करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता संघाची लोअर ऑर्डर कोण सांभाळणार?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *