Headlines

IPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर

[ad_1]

Mumbai Indians Team IPL 2023: यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल ऑक्शन 2023 (IPL Acution 2023) मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे हा मोठ्या एका टी-20 लीगमधून बाहेर पडली आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार, या खेळाडूची दुखापत बरी होण्यासाठी वेळ लागू शकतो. 

मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला दुखापतग्रस्त

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) मध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन (Cameron Green) ला दुखापत झाली आहे. नुकतंच आयपीएलच्या ऑक्शनमध्ये कॅमरून ग्रीन (Cameron Green) ला 17.5 कोटी रूपयांमध्ये खरेदी केलं होतं. याच खेळाडूच्या हाताला आता गंभीर दुखापत झाली आहे. 

या टी-20 लीगमधून बाहेर झाला

ऑस्ट्रेलियन फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्कियाचा बॉल थेट कॅमेरून ग्रीनच्या ग्लोव्हजमध्ये पोहोचला. यानंतर त्यांच्या बोटातूनही रक्त येऊ लागलं. या दुखापतीमुळे त्याचं बोट देखील फ्रॅक्चर झालं असून तो या टेस्ट सिरीजमधून बाहेर पडलाय. त्यामुळे आता त्याने बीबीएल (Big Bash League) मधून आपलं नाव मागे घेतलं आहे. या T20 लीगमधील पर्थ स्कॉचर्स टीमचा तो भाग आहे.

बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ग्रीनने केला होता उत्तम खेळ

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी कॅमेरून ग्रीनने 5 विके्टस घेतल्या. कॅमेरूनच्या 5 विकेट्सने यजमान ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या संघाला 189 धावांवर ऑल आऊट केलं. ग्रीननेही 27 धावा देऊन 5 विकेट्स घेत त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी केली. आयपीएल लिलाव पार पडल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या ग्रीनने चमकदार कामगिरी केली. ग्रीनच्या या कामगिरीने मुंबई इंडियन्सने खर्च केलेले 17.5 कोटी वाया गेले नाही हे दाखवून दिलं आहे. एकट्या ग्रीननेच आफ्रिकेचा अर्धा संघ माघारी पाठवला. 

बीसीसीआय करणार आयपीएलच्या शेड्यूलमध्ये बदल?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या आयपीएलचा 16 वा सिझन आहे. 1 एप्रिलपासून या सिझनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यासोबतच बीसीसीआय (BCCI) यावेळी 74 दिवसांची आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे. मात्र आयपीएलच्या या प्लॅनिंगवर पाणी फेरलं जाऊ शकतं. 

यंदाच्या आयपीएलमध्ये 10 टीम्स असल्याने बीसीसीआय 2023 चं आयोजन 74 दिवसांसाठी करू इच्छिते. मात्र त्यांची ही योजना किती प्रमाणात यशस्वी ठरेल, यावर प्रश्नचिन्ह आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा यंदाचा सिझन 60 दिवसांपर्यंत खेळवला जाऊ शकतो. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *