Headlines

India vs Sri Lanka Ticket booking: अवघ्या 700 रूपयांत मिळतंय तिकीट; कसं कराल बूक?

[ad_1]

India Vs Sri Lanka Series Ticket Price : भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 टी-20 सामने आणि 3 सामन्यांची वनडे सिरीज (one day series) सुरु होणार आहे. भारतीय प्रत्येक चाहत्याच्या मनात सामना पहायला जाण्याची इच्छा असते. अशातच सिरीजचा पहिला सामना वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तिकीटांचं ऑनलाईन बुकींग (online Ticket booking) करून तुम्ही सामना पहायला जाऊ शकता. तुम्हालाही स्टेडियममध्ये जाऊन पहायची असेल, तर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणार आहोत. 

700 चे 15000 पर्यंत आहे तिकीटांची किंमत

वानखेडे हे देशातील सर्वाच चर्चेत राहणारं आणि बरंच जुनं क्रिकेट ग्राऊंड आहे. या ठिकाणी सामना पहायला अनेकजण येतात. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याच्या तिकीटांची किंमत ही 700 रूपयांपासून ते 15 हजारांपर्यंत आहे. तुम्ही तिकीट काऊंटवर किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकता.

कसं करावं ऑनलाईट तिकीट बुकींग

BookMyShow आणि Paytm Insider App च्या माध्यमातून तुम्ही तिकीटांची खरेदी करू शकता. Paytm Insider किंवा BookMyShow एपमध्ये जाऊन तुम्हाला स्पोर्ट्स/क्रिकेट कॅटेगिरी सिलेक्ट करावी लागणार आहे. यानंतर सिरीजच्या सर्व सामन्यांची लिस्ट येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या सामन्याचं तिकीट खरेदी करायचं आहे, त्यावर सिलेक्ट करा. 

ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तिकीट बुक करण्याचा ऑप्शन दिसेल. ज्यानंतर तुम्हाला ओके केल्यानंतर विविध तिकीटांच्या कॅटेगिरीनुसार किमती दाखवण्यात येतील. इथे तुम्हाला आवडीची सीट सिलेक्ट करून पैसे भरायचे आहेत. प्रक्रिया पूर्ण झाली की, बुक तिकीट तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर येणार आहे. स्टेडियममध्ये तुम्हाला या तिकीटाची कॉपी तुमच्या आयडी प्रुफसोबत दाखवावी लागणार आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का

दुखापतीच्या कारणामुळे टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 सिरीज खेळणार नाहीये. बांगलादेशाविरूद्ध झालेल्या वनडे सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात नियमित कर्णधार (Rohit Sharma) ला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याने टेस्ट सिरीजमध्ये भाग घेतला नव्हता. अशातच आता याच दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमधून बाहेर झाला आहे. 

कर्णधारपद ‘या’ खेळाडूकडे जाण्याची शक्यता

नुकतंच न्यूझीलंडच्या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या टी-20 सिरीजमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. त्यामुळे आता हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ला आगामी काळात भारताचा नियमित कर्णधार बनवण्याची शक्यता आहे.

श्रीलंकेविरूद्ध वनडे आणि टी-20 सिरीज

टीम इंडिया आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीजचा पहिला सामना 3 जानेवारी रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजचं कसं असणार आहे, ते पाहूयात

तारीख                 सामना                जागा

3 जानेवरी            पहिली टी20          मुंबई

5 जानेवरी           दूसरी टी20             पुणे

7 जानेवरी          तीसरी टी20           राजकोट

10 जानेवरी        पहिली वनडे           गुवाहाटी

12 जानेवरी        दूसरी वनडे           कोलकाता

15 जानेवरी        तीसरी वनडे         तिरुवनंतपुरम[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *