Headlines

IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?

[ad_1]

Team India Squad Announced : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने टीम इंडियात कोण कोण असणार याबाबत उत्सुकता होती. अशातच आता टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) संघात मोठे बदल केले आहेत. (IND vs SL Inside Story behind Team India selection Whos promotion whos demotion marathi news)

भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीला ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली गेली. वनडे सामन्यात रोहित कॅप्टन (Captain) असला तरी टी-ट्वेंटीमध्ये (T20) वनडेची कॅप्टन्सी रोहित शर्माकडे आहे. 

टी-ट्वेंटी (T20) आणि वनडे (ODI) सामन्यात हार्दिक पांड्याचं प्रमोशन होताना दिसतंय. हार्दिक पांड्याकडे वनडे सामन्यात कॅप्टन्सी (Team India Captain) दिली गेली नसली तरी त्याला उपकर्णधारपदाची (vice captain) जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे के एल राहूलचं डिमोशन झालंय. तसेच टी-ट्वेंटीमध्ये के एल राहूलच्या (KL Rahul) जागी सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) वर्णी लागल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

टीम इंडियाच्या (Team India) नेतेपदाची सुत्र हालली असताना संघात देखील बदल झाल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनने (Sanju Samson) टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलंय. राहुल त्रिपाठीला देखील T-20 संघात संधी देण्यात आली आहे. तर सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या रिषभ पंतला (Rishabh Pant) नारळ दिला आहे.

दरम्यान, यंगिस्तान टीमचा कॅप्टन राहिलेल्या शिखर धवनला (Shikhar Dhawan) देखील संधी मिळाली नाही. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि बुमराहला (Bumrah) संधी देण्यात आली नाही. तर शिवम मावी (Shivam Mavi) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) या दोन युवा खेळाडूंना टी-20 साठी संघात सामील करून घेण्यात आलंय. टी-20 साठी नवे ते छावे, असं सुत्र बीसीसीआयने (BCCI) ठेवल्याचं पहायला मिळतंय.

श्रीलंका टी-20 साठी भारताचा संघ (India’s squad for Sri Lanka T20Is): हार्दिक पंड्या (C), ईशान किशन (wk), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (VC), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शल पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

आणखी वाचा – Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

श्रीलंका वनडेसाठी भारताचा संघ (India’s squad for Sri Lanka ODIs): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (wk), ईशान किशन (wk), हार्दिक पंड्या (VC), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मो. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *