Headlines

Ind vs Sa: ‘या’ 5 चुकांमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, जाणून घ्या

[ad_1]

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा (Team India) विजयरथ रोखला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा 5 विकेटस राखून पराभव केला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग काहीसा अवघड झाला आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर विजयी लयीत असलेल्या रोहित सेनेच्या नेमक्या चुका कुठे घडल्या असा प्रश्न आता समोर येत आहे. या चुका जर टीम इंडियाने वेळीच सुधारल्या नाही तर वर्ल्ड कप हातून गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चुका कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.

बॅटींगचा निर्णय का घेतला?

रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकत प्रथम बॅटींग का घेतली असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण फास्ट आऊटफिल्ड असलेल्या मैदानावर सुरुवातीला बॉलर्सना स्विंग आणि वेग मिळतो. या गोष्टीचा फायदा घेऊन प्रतिस्पर्धी संघाना दबावात आणता येते. त्यामुळे रोहितने प्रथम बॅटींग करण्याचा घेतलेला निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही आहे. त्याचवेळी दीपक हुड्डाला का खेळवलं असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या सामन्यात त्याला संधी देऊनही त्याला त्याचं सोन करता आलं नाही. 

हे ही वाचा : दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ सुपरकॅचची पुन्हा चर्चा

खराब ओपनिंग

टीम इंडियाच्या (Team India) ओपनिंगचा खुप मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण गेल्या तीनही सामन्यात टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने फारशी काही कमाल दाखवली नाही. आजच्या सामन्यात राहुलला दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. रोहित देखील 15 धावाचं करून आऊट झाला. या दोघांना पहिल्या विकेटसाठी केवळ 25 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या ओपनिंगचा प्रश्न गंभीर आहे. जर ओपनिंग जोडीने चांगली सुरूवात करून दिली असती तर नक्कीच मोठा स्कोर उभारता आला असता. 

मिडल ऑर्डर फेल 

सुर्या आणि विराट वगळता सर्वंच खेळाडू मिडल ऑर्डरमध्ये फेल ठरताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत ओपनिंग जोडी स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजीही चालली नाही. विराट कोहली 12 च धावा करू शकला. तसेच विश्वचषकात कारकिर्दीतील पहिला सामना खेळणाऱ्या दीपक हुडा शुन्य धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या (2) धावा करून बाद झाला. त्यामुळे मिडल ऑर्डर देखील फेल ठरताना दिसत आहे.  

चांगला स्कोरबोर्ड उभारता आला नाही 

टीम इंडियाच्या (Team India) 5 विकेट 49 धावांवर पडल्या असतानाही सूर्यकुमारने मैदानावर जम बसवत अर्धशतक ठोकलं होतं. यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 133 धावांपर्यंत पोहोचली होती. भारताने जर आणखीण 25-30 धावा ठोकल्या असत्या तर नक्कीच या सामन्याचा निकाल वेगळा असता. त्यामुळे टीम इंडियाला चांगला स्कोरबोर्ड उभारता आला पाहिजे. नाहीतर पराभवाला सामोर जावे लागेल.  

खराब फिल्डींगचा फटका

या सामन्यात दोन मोठे प्रसंग घडले, जिथे अतिशय खराब फिल्डींग पाहायला मिळाली. आणि मार्कराम दोन्ही प्रसंगी वाचला होता.दुसर्‍यांदा 13व्या षटकात मार्कराम बचावला, जेव्हा रोहितने साधी धावबाद होण्याची संधी गमावली. त्यानंतर 12व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विराटने अश्विनच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर झेल सोडला. तेव्हाही मार्कराम 36 धावांवर खेळत होता. मार्करामने 52 धावा केल्या आणि भारताचा 16 धावांनी पराभव केला. भारताने दोन्ही संधी गमावल्या नसत्या तर कदाचित या सामन्याचा निकाल थोडा वेगळा लागला असता. 

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (South Africa) पराभवानंतर आता टीम इंडियाचे (Team India) पुढील सामने बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध असणार आहेत. या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया सेमी फायनलपर्यंत पोहोचणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *