Headlines

‘सिंघम अगेन’ मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायक! लूकपर्यंत ठिक, पण चाहते त्याला काय म्हणतायत पाहिलं?

[ad_1]

Arjun Kapoor in Singham Again : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2023 मध्ये त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी सांगितलं की या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे कलाकार दिसणार होते. त्यांच्याशिवाय या चित्रपटात पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना दीपिका पदुकोण ही पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता यात अर्जुन कपूर देखील दिसणार आहे. तर अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 

रोहित शेट्टीच्या पोलिसांवर आधारीत असलेल्या या सीरिजमध्ये 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना अजय देवगणला दुखापत झाल्याचे देखील म्हटलं जात होतं. रणवीर ते दीपिका सगळ्यांचे फर्स्ट लूक दाखवण्यात आले. आता अर्जुन कपूरचा पहिला लूक समोर आला आहे. त्याचा फोटो स्वत: अर्जुन कपूरनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अर्जुननं कॅप्शन दिलं की ‘सिंघमचा खलनायक! हिट मशीन रोहित सेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा एक भाग होण्याचा आनंद हा गगनात मावेना असा झालाय. मी तुम्हाला वचन देतो की हा चित्रपट सगळ्यांच्या मनावर नक्कीच राज्य करेल.’ तर अर्जुन कपूरच्या लूकविषयी बोलायचे झाले तर त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. तर त्याच्यामागे बरेच लोक असून त्यांच्या हातात शस्त्र असल्याचे पाहायला मिळत आहे. 

त्याशिवाय अर्जुन कपूरचा आणखी फोटो समोर आला आहे. त्या दोघांच्या चेहऱ्याचा क्लोजअप शॉर्ट दाखवण्यात आला आहे. ज्यात ते दोघं टशनसोबत एकमेकांकडे पाहत असल्याचे दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करत बॉबी देओलनं फायर इमोजी आणि ऑल द बेस्ट म्हटलं आहे. मलायका अरोरानं देखील फायर इमोदी शेअर करत तिला किती आनंद झाला हे दाखवलं आहे. वरुण धवन, ताहिरा कश्यप आणि हुमा कुरैशी यांनी देखील यावर कमेंट करत अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्याच्या चाहत्यांनी त्याला या नव्या हटके भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.

हेही वाचा : …म्हणून ट्विंकल दिसताच बॉबी वापरायचा अपशब्द! दोघांमध्ये सतत व्हायची भांडणं

दरम्यान, या चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांविषयी बोलायचे झाले तर अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर करीना कपूर अजय देवगणसोबत दिसणार असल्याचे म्हटले जाते. तर या सगळ्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *