Headlines

‘मी पैशांचा विचार केला नाही, फक्त लक्ष्यासाठी…’, वर्षा उसगांवकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1]

Varsha Usgaonkar On Laxmikant Berde : चेहऱ्यावरची निरागसता, शब्दांचे अचूक बंध अन् भोळाभाबळा विनोदी मर्म असा उल्लेख केल्यावर एकच चेहरा समोर येतो, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे… मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला खराखुरा हिरा…! काळानुसार कलाकारीची व्याख्या बदलत गेली. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मराठी रसिकांच्या मनात लक्ष्याची प्रतिमा आजही कायम आहे. आपल्या विनोदी शैलीनं मराठी माणसांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांना म्हणजे आपल्या लाडक्या लक्ष्याचे आजही किस्से सांगितले जातात. अशातच एका मुलाखतीत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

वर्षा उसगांवकर काय म्हणाल्या?

आज लक्ष्या असता तर तो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चमकला असता, असं मला वाटतं. लक्ष्याने मालिकांमध्ये खूप नाव कमावलं असतं, असं वर्षा उसगांवकर यांनी म्हटलं आहे. लक्ष्या खूप उत्साही आणि टॅलेन्टेड कलाकार होता. त्याच्या कलाकारीमध्ये त्याच्या छटा दिसायच्या. माझ्या कलागुणांचा एक वेगळा पैलू लोकांना दिसला पाहिजे, असं लक्ष्याला वाटत होतं. त्यानंतर लक्ष्याबरोबर ‘एक होता विदूषक’ नावाचा चित्रपट केला. डॉ. जब्बार पटेल यांनी लक्ष्याला ‘एक होता विदूषक’ ऑफर केला. पू.ल देशपांडे यांनी या सिनेमाचे संवाद लिहिले होते. त्यामुळे सिनेमा अतिशय सुंदर होता. मात्र, तो सिनेमा चालला नाही, असं वर्षा उसगांवकर सांगतात.

एक दिवस मला लक्ष्याचा फोन आला. तुला हा चित्रपट करायचा आहे, असा आग्रह लक्ष्याने केला होता. तुला नेहमी हिरोईन ओरिएंटेड रोल करायचे असतात. मात्र, हा हिरो ओरिएंटेड रोल आहे. मी हा सिनेमा करणार आहे आणि मला या सिनेमामध्ये तू हवी आहेस, असं लक्ष्या मला म्हणाला. तुला जास्त पैसे निर्मात्यांकडून मिळणार नाही, पण तू माझ्यासाठी हा सिनेमा कर, असं लक्ष्याने मला सांगितलं. मी त्यानंतर कथा ऐकली आणि मला ती आवडली. मी ऑफर कबूल केली आणि आजिबात पैश्यांचा विचार केला नाही, असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

सिनेमा शुट करताना लक्ष्या मला नेहमीपेक्षा वेगळा वाटला. तो या सिनेमामध्ये प्रत्येक सीनवेळी उपस्थित होता. त्यामुळे मी देखील अचंबित झाले होते. त्याला या सिनेमामध्ये खुप रस होता. या चित्रपटात त्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स दिला होता. सर्वांना तो आवडला होता. मात्र, त्याला त्यावर्षी अवॉर्ड मिळाला नाही. त्यामुळे लक्ष्याला वाईट वाटलं होतं. जर सिनेमाला अवॉर्ड मिळाला असता आणि चित्रपट चालला असता तर लक्ष्याला स्वत:चा वेगळा पैलू मांडता आला असता. लक्ष्याला विनोदी चित्रपटातून बाहेर पडता आलं असतं. त्याला अवॉर्ड मिळाला नाही, याची मला नक्कीच खंत वाटते, असं वर्षा उसगांवकर यांनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *