Headlines

‘मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा…’, सनी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, ‘बॉबीने अशा…’

[ad_1]

रणबीर कपूर, बॉबी देओल यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून, अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. बॉबी़ देओलच्या हाती तर मोजक्या काही मिनिटांची भूमिका असूनही सुपरहिट ठरली आहे. यादरम्यान सनी देओलने संदीप रेड्डी वंगाच्या या चित्रपटावर आपलं मत मांडलं आहे. 

‘गदर 2’ चा अभिनेता सनी देओलने पीटीआयशी संवाद साधताना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर भाष्य केलं आहे. चित्रपटातील आपल्या भावाच्या अभिनयाने आनंदी असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. दरम्यान चित्रपटाचं कौतुक करताना त्याने त्यातील काही गोष्टी आपल्याला आवडलं नसल्याचंही स्पष्टपणे म्हटलं. एक व्यक्ती या नात्याने मला काय आवडलं आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचंही त्याने सांगितलं. तसंच बॉबी आता लॉर्ड बॉबी झाल्याचंही म्हटलं. 

“मी बॉबीसाठी फार आनंदी आहे. मी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट पाहिला असून मला तो आवडला आहे. हा एक चांगला चित्रपट आहे. काही गोष्टी मला आवडल्या नाहीत. पण ते ठीक आहे. अनेकदा मला माझ्याही चित्रपटातील काही गोष्टी आवडत नाहीत. एक व्यक्ती या नात्याने मला तो अधिकार आहे. पण एकूण पाहता हा चित्रपट मला आवडला आहे. हा एक चांगला चित्रपट आहे. चित्रपटाचं संगीतही चांगलं असून, सीनला मॅच होणारं आहे. माझ्यासाठी बॉबी नेहमीच बॉबी आहे. पण आता तो लॉर्ड बॉबी झाला आहे,” असं सनी देओलने म्हटलं आहे.

‘अ‍ॅनिमल’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

 ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच दमदार कमाई केली असून, 14 दिवसानंतरही थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही. भारतात हा चित्रपट 500 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. तर जगभरात 14 दिवसात 772 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. ज्याप्रकारे चित्रपट चालत आहे ते पाहता तो लवकरच 800 कोटींचा आकडा गाठेल. 

 ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज झाला होता. संदीप रेड्डी वांगाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  ‘अ‍ॅनिमल’ मध्ये वडील आणि मुलाचं नातं दाखवण्यात आलं आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *