Headlines

अंबानींच्या लग्न सोहळ्यात शाहरुख, सलमान आणि आमिरने किती मानधन घेतलं?

[ad_1]

Anant Ambani’s pre-wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वीच 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचे प्री-वेडिंग सोहळा होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांना आमंत्रण होते. मायक्रोस्फॉटचे संस्थापक बिल गेट, मेटाचा सीईओ मार्क झुकेरबर्ग यासह अनेक हॉलिवूड, बॉलिवूड व क्रीड क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा जगभरात होत आहे. 

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी अनंत-राधिका यांच्या लग्नसोहळ्यासाठी अफाट खर्च केला आहे. प्री-वेडिंगसाठी जवळपास लाखो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. प्री वेडिंग सोहळ्यात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. तर, काहींनी परफॉमदेखील केले होते. दीपिका-रणवीर, सारा अलीखान, जान्हवी कपूर यांनी या कार्यक्रमात परफॉर्मन्स केला होता. तर, या सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती खान मंडळीच्या नृत्याची. 

बॉलिवूडच्या तीनही खानने या सोहळ्यात किती मानधन घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 3 मार्च रोजी अनंत- राधिका यांचा टस्कर ट्रेल्स आणि हस्ताक्षर कार्यक्रम पार पडला. टस्कर ट्रेल्स याद्वारे जामनगर, वनतारा फिरवण्यात आलं. त्यानंतर हस्ताक्षर कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी तब्बल 1000 कोटींचा खर्च पडला. तर, संध्याकाळच्या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी चार चाँद लावले. 

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात किंग खान शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान या कलाकारांनी एकत्र परफॉर्म केले. मात्र, या परफॉर्मन्ससाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं याची चर्चा असतानाच एका रिपोर्टनुसार या तिन्ही कलाकारांनी एकही रुपया अंबानींकडून घेतला नाहीये. बॉलिवूडच्या तीन्ही कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर डान्स केला. त्यावेळी या खान मंडळींसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण याने देखील परफॉर्मन्स केला होता. या परफॉर्मन्ससाठी त्यानेही कोट्यवधी रुपये घेतले असतील, असं म्हटलं जातं. पण त्यानेदेखील काहीच मानधन घेतलं नाहीयेय.

रिहानाने परफॉर्मन्ससाठी किती रुपये घेतले?

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने अंबानींच्या कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपये घेतल्याचे समोर आले आहे. प्री-वेडिंगमध्ये परफॉर्मन्साठी रिहानाला तब्बल ५२ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय कॅटरिंगवर १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२ जुलैला अनंत व राधिका यांचा मुंबईत शाही लग्नसोहळा होणार आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *