Headlines

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

[ad_1]

Akshay Kumar announces Housefull 5 :  बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) हाऊसफुलच्या पाचव्या ( Housefull 5) भागासाठी निर्माता साजिद नाडियादवालासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या वर्षी रिलीज होणार्‍या ‘हाऊसफुल 5’ची निर्मात्यांनी घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘दोस्ताना’ फेम तरुण मनसुखानी करणार आहेत. नाडियादवाला आणि अक्षय कुमार यांनी बॉक्स ऑफिसवर सलग हिट चित्रपट दिले आहेत आणि ‘हाऊसफुल’ ( Housefull) मालिकेने गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत प्रतिभावान अभिनेता रितेश देशमुखही (Riteish Deshmukh) दिसणार आहे. त्यामुळे मनोरंजन आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट तुम्हाला एका रोलर-कोस्टर राईडची मजा देईल. 

अक्षय कुमारने कॉमेडी फ्रँचायझीचा पाचवा भाग हाऊसफुल 5 ची घोषणा केली आहे. असं म्हटलं की या चित्रपटात ‘पाचपट वेडेपण’ असणार आहे. हा चित्रपट तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि साजिद नाडियादवाला निर्मिती करणार आहे. याबाबत ट्विट रितेश देशमुख या चित्रपटाचा भाग असेल याची पुष्टी केली आहे. मात्र उर्वरित कलाकार कोण आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. पुढच्या वर्षी 2024 दिवाळीच्या आसपास हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  

वाचा: 3 Idiots च्या सिक्वेल येतोय? देवभोळा ‘राजू’ साकारणाऱ्या शरमन जोशीचा मोठा खुलासा

पहिला हाऊसफुल (Housefull) चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला आणि साजिद खानने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, लारा दत्ता, दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल, मिथुन चक्रवर्ती आणि बोमन इराणी यांचा समावेश होता. हा चित्रपटाची कथा आरुष (Akshay Kumar) एक दुर्दैवी माणूस जो जिथे जातो तिथे आपले दुर्दैव सोबत घेऊन जातो. त्याच्या प्रेमाच्या शोधामुळे त्याचे जीवन अधिक दयनीय झाले असते आणि तो अडचणीत सापडला असता. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि 2012 मध्ये त्याचा सिक्वेल रिलीज झाला.

दुसऱ्या भागात जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि असिनसारखे नवे कलाकार चित्रपटात दिसले. तर फ्रँचायझीचा (Housefull 3) तिसरा भाग 2016 मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाचे कथानक एका श्रीमंत उद्योगपतीभोवती केंद्रित होते. दरम्यान 2019 मध्ये (Housefull 4) चौथा भाग रिलीज झाला होता. चौथ्या भागासाठी या संकल्पनेने कॉमिक टच जोडला. तीन भावांची, तीन बहिणींची लग्नं होणार आहेत. पण भूतकाळ आणि वर्तमान यांच्या अडकतात. 

अक्षय कुमार सध्या ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. याशिवाय ऑल टाईम कॉमेडी चित्रपट हेरा फेरी 3 चही शुटिंग करता है. ‘ओह माय गॉड 2’ देखील रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. इतकंच नाही तर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेदात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *