Headlines

हनीमूनला पती संग्राम सिंगचे पाय चेपतानाचा अभिनेत्रीचा तो व्हिडीओ आला समोर

[ad_1]

मुंबई  : अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता पायल आणि संग्राम सिंग लग्नानंतर एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत आणि या जोडप्यानं त्यांच्या हनिमूनचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

गेल्या काही काळापासून पायल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या हनीमूनचे फोटो सतत शेअर करत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पायलनं बिकिनीमध्ये तिचे जबरदस्त लूक दाखवला आहे. पायलच्या परफेक्ट टोन्ड बॉडीवरून चाहत्यांच्या नजरा हटेना.

पायलनं आणखी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा पती संग्रामसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये पायल कधी संग्रामचे पाय दाबत आहे, तर कधी त्याच्यासोबत कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे. हे शेअर करत पायलनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आयुष्य असे जगा जणू सर्व काही तुमच्या बाजूनं आहे.’

काही दिवसांपूर्वी पायलनं ‘बॉम्बे टाइम्स’सोबत तिच्या हनिमूनच्या प्लॅन्सबद्दल बोलताना सांगितले की, ‘आम्ही श्रीनगरला जाण्याचा विचार करत आहोत. जर आपण परदेशात प्रवास केला तर ते एकतर मॉरिशस किंवा मालदीव असेल.’ आता ती मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पायलनं लग्नानंतर तिचे आयुष्य कसे होते हे देखील सांगितले होते. ती म्हणाली, ‘आयुष्य तसंच होतं. लग्नानंतर गोष्टी बदलतात हा केवळ एक विश्वास किंवा कदाचित सामाजिक मानसिकता आहे. मी त्याचाही आदर करतो, पण संग्रामजी आणि माझ्यातलं नातं सारखंच आहे. हे इतकेच आहे की आम्ही एकमेकांबद्दल अधिक काळजी घेणारे आणि केअरिंग झालो आहोत, कारण आम्हाला माहित आहे की हे नातं कायमचे आहे.’

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांची लव्हस्टोरी खूप खास आहे. जवळपास 12 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 9 जुलै 2022 रोजी आग्रा येथे सप्तपदी घेतल्या. आता दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *