Headlines

‘होम मिनिस्टर’चं 20 व्या वर्षात पदार्पण; 6 भागांपुरता असलेला कार्यक्रम 6000 भाग पूर्ण करणार

[ad_1]

Home Minister in 20th year: ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आपल्या सर्वांचाच लाडका कार्यक्रम आहे. त्यातून या कार्यक्रमाची अनेकदा चर्चा रंगलेली असते. हा कार्यक्रम 2004 साली सुरू झाला होता. आता करत करत हा कार्यक्रम 20 व्या वर्षात पदार्पण करतो आहे. या कार्यक्रमाला तसेच अभिनेते आदेश बांदेकर यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. महाराष्ट्राचे लाडके भावजी म्हणून त्यांची लोकप्रियता कायम आहे. टेलिव्हिजन हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. त्यावेळी हिंदी मालिकांची चांगलीच स्पर्धा होती. त्यातून ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेल्या मालिकांनी हिंदी मालिकांनाही टक्कर द्यायला सुरूवात केली होती. आजही ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका या आजही लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून ‘होम मिनिस्टर’ ही मालिका तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या अगदी घराघरात पोहचली आहे. 

‘दार उघड बये दार उघड’ म्हणत सुरू झालेला ‘होम मिनिस्टर’चा हा प्रवास आता 20 व्या वर्षात पदार्पण करतोय. आजच्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबरला ‘होम मिनिस्टर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. जवळपास 10 लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास, 6000 भाग आणि 12000 घर इतका मोठा पल्ला ह्या कार्यक्रमाने गाठला आहे. 

ह्या प्रवासाबद्दल विचारलं असता आदेश बांदेकर म्हणतात, ”हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. 6 भागांपुरता मर्यादित असलेला हा कार्यक्रम आता 6000 भाग पूर्ण करतोय. महाराष्ट्रातील स्त्रीचा, वहिनींचा सन्मान करता करता त्या घरात माझंही औक्षण झालं आणि कळत नकळत मीही त्या घराचा सदस्य झालो. प्रत्येक घरात गेल्यावर त्या माऊलीच्या चेहेऱ्यावर प्रसन्न भाव असतो. काही क्षण का होईना पण ती माऊली दिवसभराचं टेन्शन, थकवा विसरून जायची. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटतं म्हणून कितीतरी जणांनी हॉस्पिटल मधून मला व्हिडिओ कॉल केलेत. मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो.” असे ते म्हणाले. 

झी मराठी वाहिनीवर आजपर्यंत ‘या’ कार्यक्रमांचे 25 हून अधीक पर्व झालेत ते पुढील प्रमाणे :

‘नांदा सौख्य भरे’, ‘पंढरीची वारी विशेष’, ‘नववधू नं 1’, ‘जाऊबाई जोरात’, ‘स्वप्न गृह लक्षमीचे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘गोवा विशेष’, ‘काहे  दिया परदेश’, ‘चूक भूल द्यावी घ्यावी’, ‘अगंबाई सुनबाई’, ‘महाराष्ट्र दौरा’, ‘भारत दौरा’, कोरोना काळात झालेला ‘होम मिनिस्टर घरच्याघरी’, ‘कोरोना योद्धा विशेष’, ‘सासुबाई माझ्या लईभारी’ आणि नुकतंच पार पडलेलं ‘महामिनिस्टर’ हे पर्व विशेष गाजलं कारण वहिनींना मिळणार होती सोन्याची जर असलेली 11 लाखांची पैठणी. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *