Headlines

‘उच्चभूंच्या पार्टीत मजेच्या नावाखाली घृणास्पद प्रकार,’ Gigi Hadid ला किस केल्याने ट्रोल करणाऱ्याला वरुणने दिलं उत्तर, म्हणाला…

[ad_1]

Varun Dhawan on Kissing Gigi Hadid: निता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्धाटन सोहळा नुकताच पार पडला. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहुण्यांसाठी एका छोट्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी सुपरमॉडेल गिगी हॅडीडलाही (Gigi Hadid) निमंत्रित करण्यात आलं होतं. कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) गिगीचं स्वागत करताना मंचावर आमंत्रित केलं. यावेळी त्याने गिगीला आपल्या हातात उचलून घेत गालावर किस केलं. दरम्यान यावरुन नेटिझन्सनी नाराजी जाहीर केली असून, गिगी यावेळी फारच अस्वस्थ दिसत होती असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर ट्रोल केलं जात असताना वरुणने ट्वीट करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. 

NMACC Gala मधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओत वरुण धवन मंचावर परफॉर्म करताना दिसत आहे. यावेळी तो गिगीला मंचावर बोलावतो. गिगी मंचावर येताच वरुण तिला उचलून घेतो आणि गालावर किस करतो. यानंतर गिगी मंचावरुन खाली उतरते. 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी वरुणवर टीका केली आहे. वरुणने गिगीची परवानगी न घेताच तिला किस केलं असं काहींनी म्हटलं आहे. “जर तुम्ही एक महिला असाल, तर तुम्ही कोणासोबतही सुरक्षित नाही, मग तुम्ही गिगी असलात तरीही. “उच्चभ्रू” असणाऱ्या एका पार्टीत तुम्हाला आमंत्रित केले जाते आणि वरुण धवनसारखे लोक तुम्हाला उचलतील आणि तुमच्या संमतीशिवाय चुंबन घेतील. मजेच्या नावाखाली हे घृणास्पद आहे,” असं ट्वीट एका युजरने केलं होतं. हे ट्वीट नंतर डिलीट करण्यात आलं. 

वरुणने दिलं उत्तर 

सोशल मीडियावर टीका होऊ लागल्यानंतर वरुण धवनने ट्वीट करत हे सर्व पूर्वनियोजित होतं असं उत्तर दिलं आहे. “मला वाटतंय आज तुम्ही झोपेतून उठून जागे होण्याचं ठरवलं आहे. तर तुमच्यासाठी म्हणून सांगतो की, तिने मंचावर येणं पूर्वनियोजित होतं. त्यामुळे ट्विटरला काहीतरी नवं शोधा, किंवा मग बाहेर जाऊन काहीतरी चांगलं शोधा. शुभ सकाळ,” असं ट्वीट वरुणने केलं आहे.

वरुणने ट्वीट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी वादावर स्पष्टीकरण दिल्याबद्दल आभार मानले आहेत. काही लोकांना अशा गोष्टी सहज घडतात असं वाटतं असं त्याच्या एका चाहत्याने म्हटलं आहे. तर एकाने तुला आपली बाजू मांडावी लागली याचा खेद असल्याचं म्हटलं. 

निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (NMACC) उद्धाटन सोहळा 31 मार्चला पार पडला. मुंबईतील Jio वर्ल्ड सेंटरमध्ये हे सेंटर उभारण्यात आलं आहे. उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी छोट्या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये असलेले हे केंद्र निता अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भारतीय कला प्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्याचा त्यांचा हेतू आहे. 

या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. प्रियांका चोप्रा, निक जोनास, गिगी, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, करीना कपूर, सैफ अली खान, करण जोहर, टॉम हॉलंड आणि इतर अनेकजण उपस्थित होते.

 [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *