Headlines

“हे तीन महिन्याचं बाळ, त्यांनी बाळासाहेब ठाकरे…”, गुलाबराव पाटलांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल | Gulabrao Patil criticize Sushma Andhare over verbal attack on Eknath Shinde faction of Shivsena

[ad_1]

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. तसेच सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला. गुलाबराव पाटील चोपडा तालुक्यातील धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, धानोऱ्याचे सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात एक नोव्हेंबरला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होत आहे. याबद्दल गुलाबराव पाटलांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

गुलाबराव पाटील म्हणाले, “सुषमा अंधारे हे इकडे येऊन तीन महिने झालेलं बाळ आहे. या पक्षामध्ये येऊन त्यांना तीन महिन्याचाच काळ झाला आहे. त्यांचं बोलणं सगळेजण ऐकत आहेत. त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल काय बोलल्या आहेत त्या क्लिपा एकदा ऐकवल्या पाहिजेत.या बाईने हिंदू देवतांवर भयानक टीका केली आहे. त्याही क्लिपा दाखवल्या तर बरं होईल.”

“हिंदू देवतांवर या बाईने किती भयानक टीका केली”

“सुषमा अंधारेंनी आमच्यावर टीका जरूर करावी. तो त्यांच्या पक्षाने त्यांना दिलेला अधिकार आहे. मात्र, हिंदू देवतांवर या बाईने किती भयानक टीका केली, हिंदूंबाबत किती भयानक भाषणं केली आहेत, त्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर त्या काय काय बोलल्या आहेत, हिंदू धर्मावर काय बोलल्या आहेत याच्याही क्लिप्स दाखवाव्यात. अन्यथा, आम्ही हे सहन करणार नाही,” असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला.

“कोर्टाच्या निकालाबाबत मला बोलता येणार नाही”

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या संदर्भात विचारणा केली असता गुलाबराव पाटील यांनी कोर्टाच्या निकालाबाबत मला बोलता येणार नाही. जे काही होईल ते सगळ्यांना मान्य करावे लागेल, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : उमेदवार मागे घेऊन भाजपाची वेगळी खेळी आहे का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या, “सर्व डाव…”

“आम्ही बंडखोर नाही, आम्ही उठाव केलेला आहे”

विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केल्याच्या आणि बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत वाढ केल्याच्या आरोपावर गुलाबराव पाटील म्हणाले, “आम्ही बंडखोर नाही, आम्ही उठाव केलेला आहे. आम्हाला कमिटीने सुरक्षा दिलेली आहे. ही सुरक्षा मुख्यमंत्री देत नाहीत. सुरक्षा देण्यासंदर्भात कमिटी असते आणि कमिटी ज्याप्रमाणे सूचना करते त्याप्रमाणे गृहखातं सुरक्षा देत असतं. काही लोकांची सुरक्षा कमी अधिक झाली असेल तर ते कमिटीच्या अहवालानुसार झाली असेल.”[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *