Headlines

Guess Who : फोटोतल्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

[ad_1]

Guess Who :  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

फोटोत काय?

फोटोत तुम्ही पाहू शकता, एक मुलगा फरशीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या बाजूला असलेल्या एका खेळण्याच्या गाडीवर एक लहान मुलगी बसली आहे. फोटोतला हा मुलगा ब़ॉलिवूड अभिनेता आहे. त्याने अनेक बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. अनेक चित्रपट त्याचे हिट ठरले आहेत. बॉलिवूडमध्ये त्याची एक गर्लफ्रेंड देखील आहे. ती देखील खुप लाईमलाईटमध्ये असते. दोघांच्या लव्हस्टोरीची बॉलिवूडमध्ये खुप चर्चा असते. 

दरम्यान तुम्ही जर अजूनही या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलं नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) आहे. अर्जुनचा हा बालपणीचा फोटो आहे. त्याच्यासोबत त्याची बहिण अंशुला कपूर (Anshula kapoor) आहे. अंशुलाचा आज वाढदिवस आहे, यानिमित्त त्याने बालपणीचा फोटो पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अर्जुनने (Arjun kapoor) अंशुलाला (Anshula kapoor) वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खास नोट देखील लिहली आहे, तो म्हणाला की, ‘माझा आयुष्यभराचा जोडीदार. आम्ही नेहमी सोबत असतो…चांगले,वाईट किंवा पुढचे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी छोटी बहीण अंशुला,तुम्ही सर्व शुभेच्छा देण्यास पात्र आहात. त्यांनी “हॅपी बर्थडे,” “लहान बहिण” आणि “वाढदिवस” हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. या त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

दरम्यान अर्जुन (Arjun kapoor) हा खूप काळजी घेणारा भाऊ आहे. अर्जुन कपूर अनेकदा सोशल मीडियावर त्याची बहीण अंशुला (Anshula kapoor) कपूरवर प्रेम व्यक्त करताना दिसला आहे. आता तिच्या वाढदिवसानिमित्त तो व्यक्त झाला आहे. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *