Headlines

GOOD NEWS : अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई? व्हिडीओ आला समोर

[ad_1]

मुंबई : नुकतंच अनंत अंबानी आणि राधिकी मर्चेंटचं प्रि-वेडिंग फंक्शन मोठ्या थाटा-माटात पार पडलं. या भव्य-दिव्य कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन यांच्या कुटूंबापासून ते सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, कतरिना कैफ, विक्की कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी पर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे अनेक फोटो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता एका सेलिब्रिटी कपलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलचा आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत, विक्की कौशल आणि  कतरिना कैफ पोज देताना दिसत आहे. यावेळी कतरिनाने जे कॅमेरा पाहून केलं त्यानंतर या जोडप्याची खूप चर्चा होत आहे. अनेकजण कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे.  कतरिना आणि विक्की जामनगर एअरपोर्टवर स्पॉट झाले. एकमेकांसोबत हातात हात घालून कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर पोज देण्यासाठी येतात. चाहत्यांना ते खूप आवडलं. यावेळी कतरिनाने गुलाबी रंगाचा चुडीदार परिधान केला होता. चाहत्यांना कतरिना आणि  विकी कौशलचं बॉन्डिंग खूपच आवडलं. या जोडीला आत्तापर्यंतचं सगळ्यात क्यूट कपलही अनेकांनी म्हटलं आहे.

तर अनेकांनी ती प्रेग्नंट असल्याचाही अंदाज लावला आहे. एका पापाराझीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच, एका युजरने कमेंट करत लिहीलं की, ”ती सुद्धा प्रेग्नंट आहे का?” तर अजून एकाने लिहीलंय, “याची मला काहीच हरकत नाही पण कदाचित कॅट  याची आशा करत आहे.”  तर अजून एकाने लिहीलंय, मी पैज लावतो कतरिना प्रेग्नंट आहे. तर अजून एकाने लिहीलंय, कतरिनाकडे गुडन्यूज आहे. ती पोट का लपवतेय. तर अजून एकाने म्हटलंय, ती ज्याप्रकारे पोट लपवतेय त्या प्रकारे ती नक्कीच गुडन्यूज देणार आहे. तर अजून एकाने लिहीलंय, कतरिना तु खरंचं प्रेग्नंट आहेस का? तर अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 कतरिना आणि विकी पालक होणार असल्याच्या बातमीने जरी जोर धरला असला तरी, अद्याप या जोडीने मात्र या बातमीवर मौन बाळगणंच योग्य मानलं आहे. अद्यापतरी  कतरिना आणि विकीने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी समोर आलेली बातमी अफवा असल्याचं स्पष्ट होतं. नुकतीच  रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणसोने त्यांच्या घरात चिमुकला पाहूणा येणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *