Headlines

‘गोलमाल 5’ कधी प्रदर्शित होणार? श्रेयस तळपदेने केला खुलासा, म्हणाला ‘लवकरच…’

[ad_1]

बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. याच रांगेतील एक चित्रपट सीरिज म्हणजे गोलमाल. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुचर्चित गोलमाल सीरिजने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांच्या रांगेतील गोलमाल ही सीरिज प्रचंड हिट ठरली. या सीरिजमधील ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या चार चित्रपटानंतर आता लवकरच ‘गोलमाल’च्या सिरीजमधील पुढील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने एका मुलाखतीदरम्यान याबद्दलचे भाष्य केले. 

‘गोलमाल’ सीरीजचे चारही चित्रपट हिट ठरले. त्यामुळे या सीरीजचा पाचवा चित्रपट ‘गोलमाल 5’ कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या चित्रपटाबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने काही दिवसांपूर्वी गोलमाल या चित्रपटाच्या सीरिजमधील पाचव्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता हा चित्रपट चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होणार, याची माहिती श्रेयस तळपदेने दिली आहे. 

प्रेक्षकांना वर्षभर पाहावी लागणार वाट

श्रेयस तळपदे हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘ही अनोखी गाठ’मुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तो लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटातही पदार्पण करणार आहे. यानिमित्ताने श्रेयसने ‘न्यूज 18’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत श्रेयसने ‘गोलमाल 5’ चित्रपटाबद्दल खुलासा केला. 

“‘गोलमाल 5’ या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी प्रेक्षकांना जवळपास वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाच्या शूटींगला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट 2025 च्या दिवाळीदरम्यान प्रदर्शित होईल”, अशी माहिती श्रेयस तळपदेने दिली आहे. 

2025 पासून शूटींगला सुरुवात

त्यापुढे श्रेयस म्हणाला, “गोलमाल 5′ या चित्रपटाची घोषणा ‘कोव्हिड 19’ च्या आधी करण्यात आली होती. रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही लवकरच या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करु, असे सांगितले होते. पण कोव्हिडमुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर आता रोहित सरांनी आम्ही ‘गोलमाल’ नक्की बनवणार, असे म्हटले होते. त्यामुळे मला खात्री आहे की येत्या 2025 मध्ये या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होईल आणि दिवाळीत हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.” 

‘गोलमाल’ ही चित्रपटाची सीरिज चांगलीच हिट ठरली आहे. ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले होते. या सर्वच चित्रपटात अ‍ॅक्शन, रोमान्स, कॉमेडीसह मनोरंजनाचा तडका पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता 2025 मध्ये गोलमाल या चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *