Headlines

लग्नाच्या 10 वर्षांनंतर गरोदर राहिलेली अभिनेत्री Pregnancy Complications मुळं रुग्णालयात दाखल

[ad_1]

Neha Marda Health: मातृत्त्वाची चाहूल लागणं, हा अनुभव एखाद्या स्त्रीचं आयुष्य 360 अंशांनी बदलणारा ठरतो. तिचं शरीर नव्यानं तयार होत असतं. एक नवं आयुष्य स्त्रीच्या गर्भात वाढत असतं. हा 9 महिन्यांचा काळ सोपा नसतो. सातत्यानं बदलणारं शरीर आणि त्यात रोजच्या जगण्यातील अपेक्षित समतोल या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधताना अनेक अडचणीही येतात. पण, महिलांचं शरीर या अडचणींवरही मात करतं आणि स्त्रीजन्म म्हणजे एखाद्या चमत्काराहून कमी नाही, हेच पुन्हा सिद्ध होतं. 

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री नेहा मर्दा हीसुद्धा गेल्या काही काळापासून याच क्षणांचा अनुभव घेताना दिसत आहेल. लग्नाच्या 10 वर्षांनंतर नेहा मर्दा आणि तिचा पती, आयुष्मान अग्रवाल यांच्या नात्यात एका नव्या पाहुण्याची चाहूल लागली. नेहाच्या गरोदर असण्याच्या बातमीनं चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला. सोशल मीडियावर या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. पण, याच नेहाबाबतच्या एका बातमीनं आता चाहत्यांना चिंतेत टाकलं आहे. 

 

एका प्रतिष्ठित वृत्तसमुहानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गरोदरपणाच्या शेवटच्या काळात असणाऱ्या नेहाला अचानक काही अडचणी जाणवू लागल्या आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील दोन दिवस ती रुग्णालयातच असेल, अशी माहिती सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलं आहे. (balika Vadhu fame Actress admitted in hospital due to Pregnancy complications entertainment news in marathi)

दरम्यान, नेहाचा पती किंवा तिच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीकडून अद्यापही तिच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. नेहाला इतक्या नाजुक काळात अचानक रुग्णालयात जावं लागल्याचं पाहून सध्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनीच अभिनेत्रीच्या आणि तिच्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबीयांना धीर दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

नेहाच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण… 

बऱ्याच महिन्यांपूर्वी नेहानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांच्या भेटीला आणली. गरोदरपणादरम्यान तिनं छोट्या पडद्यापासून दुरावा पत्करत स्वत:वर आणि होणाऱ्या बाळावर लक्ष दिलं. पण, या साऱ्यात ती चाहत्यांच्याही संपर्कात राहिली. Instagram Reels म्हणू नका किंवा मग एखादी पोस्ट, या सर्व उपलब्ध माध्यमातून तिनं आपल्या जीवनातील सुखद क्षण चाहते आणि फॉलोअर्ससोबत शेअर केल्याचं पाहायला मिळालं. अशा या अभिनेत्रीला या अडचणीतून सावरण्याचं बळ मिळो, हीच प्रार्थना चाहते करताना दिसत आहेत. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *