Headlines

Ganeshotsav 2023 : गणपतीचं ‘स्वागतपण भारी देवा!’ मुंबईतील महागणपतीपुढे महिलांकडून मंगळागौरीचे खेळ; पाहा Video

[ad_1]

Ganeshotsav 2023 Lalbaug Parel : गणेशोत्सव म्हटला की काही गोष्टींचा निर्विवादपणे उल्लेख केला जातो. त्यातलाच एक म्हणजे मुंबईच्या गिरणगावातील गणेशोत्सव. शहरात असणाऱ्या वस्त्रोद्योगाचं केंद्र असणारं एकेकाळचं हे गिरणगाव म्हणजेच परळ, लालबाग, काळाचौकी हा भाग गणेशोत्सवादरम्यान बहरून जातो. अनेक वर्षांपासून इथं सुरु असणारी या सणाची धून दरवर्षी आणखी वाढतानाच दिसत आहे. जुन्या पिढ्यांनी नव्या पिढ्यांकडे दिलेला हा वारसा तितक्याच नवलाईनं जपला जात आहे. यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठीही ही गणेश नगरी अर्थात हा भाग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. बऱ्याच गणेश चित्रशाळांमधून मोठाल्या गणेशमूर्ती मंडळं वाजत-गाजत मंडपांमध्ये नेताना दिसत आहेत. 

नुकताच मुंबईच्या काळाचौकी येथील काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून गणेशमूर्ती थाटामाटात मंडपात आणण्यात आली. मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यानं साकारलेली ही मूर्ती ज्यावेळी गणेश चित्रशाळेतून बाहेर आली, त्यावेळी तिथं गणरायाची एक झलक पाहण्यासाठी आलेल्या अनेकांनीच एकच कल्ला केला. 

गणेश मंडळातील ज्येष्ठ आणि तरुण अशा सर्वच कार्यकर्त्यांनी बाप्पाला मंडपात नेण्यासाठी लगबग केली, अनेकांनीच या कलाधिपती गणरायापुढं आपल्या कलेचा नजराणा सादर केला. यामध्ये महिला वर्गही मागे राहिला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे गणरायाच्या या आगमन सोहळ्यामध्ये ‘बाईपण भारी देवा’चीच हवा पाहायला मिळाली. 

आगमन सोहळ्यात मंगळागौर (Mangalagaur)

काळाचौकीच्या बाप्पातच्या स्वागतावेळी प्रत्येकाचा उत्साह आणि आंद परमोच्च शिखरावर असतानाच तिथं चापुनचोपून नऊवारी नेसलेल्या महिला एकत्र आल्या आणि सुरु झाला मंगळागौरीचा खेळ. ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या गाजलेल्या आणि विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटातील सावनी रविंद्र आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या मंगळागौरीच्या गाण्यावर या महिलांनी कमाल खेळ सादर केले. साजेसा पेहराव, दागदागिने आणि साजश्रृंगारासोबत या महिलांनी एकमेकांशी एका तालात नृत्य सादर केलं. 

(व्हिडीओ सौजन्य- कोमल हडशी)

सोशल मीडियावर या आगमन सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये महिलांच्या मंगळागौरीचा व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होताना दिसत आहे. काय मग, तुम्ही यंदाच्या गणेशोत्सव जागरणांमध्ये असाच एखादा नृत्याविष्कार सादर करण्याचा विचार करताय की नाही? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *