Headlines

Ganesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र ‘त्या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा

[ad_1]

Ganesh Chaturthi : मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून पुढील दहा दिवस गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पण अनेक लोकांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेश मूर्ती कार्यशाळेतून बाप्पाला घरी किंवा मंडळात थाटामाटात घेऊन गेले आहे. यात सेलिब्रिटी मंडळीही दिसले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही दरवर्षीची बाप्पाचं स्वागत जोरदार करते. यंदाही ती बाप्पला मोठ्या धूमधडाक्यात घरी घेऊन गेली. मात्र दुसरीकडे या आगमन सोहळ्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. (ganesh chaturthi 2023 shilpa shetty bring bappa to home husband raj kundra gets trolled)

गणपती बाप्पा आणि शिल्पा शेट्टीचं खास नातं आहे. ती दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करत असते. गेल्या वर्षी पायाला लागलं असतना विसर्जन सोहळ्याला व्हीलचेअरवर बसून डान्स करताना दिसून आली. बाप्पाच्या आगमनाने तिच्या उत्साह जणू गगना मावेना असा असतो. 

गणपती मूर्ती कार्यशाळेतून गणपतीची मूर्ती आणण्यासाठी शिल्पा शेट्टी तिच्या संपूर्ण टीमसह पोहोचली होती. यावेळी शिल्पा शेट्टी मोठ्या उत्साहात दिसून आली. मात्र यावेळी चर्चा झाली ती राज कुंद्राची… बाप्पाला घरी घेऊन जाताना राज कुंद्रा पुन्हा एकदा ट्रोल झाला. यावेळीही त्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. 

नेटकऱ्यांनी राज कुंद्रा याची शाळा घेतली. एक यूजर म्हणाला की, तू काम असं कर की तू चार लोकांना तुझं तोंड दाखवू शकशील. दुसरा म्हणाला की, हा माणूस काय विनोद बनला आहे. तर एकाने थेट विचारलं आहे, तू असं काय केलंस की तोंड लपवण्याची वेळ तुझ्यावर आली आहे. 

एका यूजर्सने तर म्हटलं शिल्पा शेट्टी तुला ओळखणार नाही. राज कुंद्रा कारमधून खाली उतरणार तेव्हा शिल्पा विचारणार की, तू कोण आहेस…

जेव्हा बाप्पाला घेऊन शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा घरी पोहोचतात. तेव्हा बाप्पाच्या स्वागतासाठी त्यांची मुलं समोर येतात. त्यावेळी मुलगी समिषा वडिलांच्या चेहरा झाकलेला हुडी काढण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसून येतं आहे. वडिलांची अशी थट्टा मस्तकरी करताना समिषाला खूप मजा येतं आहे. [ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *