Headlines

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा ‘क्रू’ चा पहिला Review समोर, कसा आहे सिनेमा?

[ad_1]

 मुंबई: करीना, तबू आणि क्रिती तीन अभिनेत्रींचा सिनेमाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  या तिघी जणी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांचा ‘क्रू’ हा सिनेमा आज प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉलिवूडची बेबो करीना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते, सध्या ती पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिचा आगामी सिनेमा आज रिलीज होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तीघींची भुमिका हटके असून चाहत्यांनी ट्रेलर पाहूनच पसंती दिली . तब्बू, क्रिती आणि करीना या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री पहिल्यांदाच  एकत्र येत प्रेक्षकांना हटके भुमिकेत दिसणार आहेत. त्यांचा नवाकोरा सिनेमा क्रु च्या माध्यामातून पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. 

अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी सिनेमाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद दिला. यातील गाणी आणि ट्रेलरमधील संवाद प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. ट्रेलरला मिळणाऱ्या पसंतीनंतर  सिनेमाबद्दल आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कमी पगाराला कंटाळलेल्या तीन एअर हॉस्टेस भोवती फिरणारं सिनेमाचं कथानक असून राजेश ए कृष्णन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला. त्यामुळे हा सिनेमा मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे. ससपेन्स, थ्रील आणि कॉमेडी अशा अंगाने असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर पाहून रिलीजच्या आधीच प्रेक्षकांनी प्रिबुकींग केले आहे. 

तीनही अभिनेत्रींचा हा  सिनेमा प्रदर्शित होण्यापुर्वीच अ‍ॅडवान्स बुकींग सुरु आहे. लुटकेसनंतर राजेश ए कृष्णन यांचा क्रू या सिनेमाला प्रेक्षकांचं किती प्रेम मिळतंय हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असं हटके कथानक याआधी झालेलं नाही. या तीनही अभिनेत्रींव्यतिरिक्त कपिल शर्मा देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. चाहत्यांचा पहिल्याच दिवशी मिळणारा प्रतिसाद पाहता रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 7 ते 8 कोटींची कमाई करु शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या तीघीही टॉपच्या अभिनेत्री असून तिघींचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. एकता कपूरने या सिनेमाची निर्माती असून क्रू बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *